डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहा – आमदार गोपीचंद पडळकर

Ahmednagarlive24
Published:

नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर अस्मितेचा विषय आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व समाजाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

नगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांची आज बैठक आ.पडळकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, काका शेळके, निशांत दातीर, ऋषी ढवण, तुषार यादव, अ‍ॅड.अक्षय भांड, विनोद पाचारणे, संतोष गावडे, ठोंबरे साहेब,

प्रथमेश तागड, सुमित कुलकर्णी, सचिन चितळकर, योगेश राहिंज, अश्विन तागड, योगेश तागड, सुभम रणसिंग, अशोक होनमाने, सुनिल महाजन, बाळासाहेब रक्ताटे, अ‍ॅड.सुनिल हरिश्चंद्रे, लक्ष्मण तागड, ओम गवळी आदि उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काशी विश्वेश्वर मंदिरातील पुतळ्यामुळे देशभरातील धनगर समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आकर्षित झाला आहे. नगर जिल्ह्यातील उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारात पहिल्यांदा जाहीर सभेत व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा पूजन करण्यात आले.

तसेच डॉ.सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काठी आणि घोंगडी देऊन सत्कार केल्याने समाजाच्या भावना उंचावणार्‍या घडल्या आहेत. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यात भाजपाच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe