पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथे उभ्या केलेल्या ग्रामविकासाच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. यावेळी पोपटराव पवार यांनी आपले मत मांडले.
अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय ऑफर मिळत होत्या, पण राजकारणापासुन दूर राहण्याचा निर्णय घेऊन गावसुधारण्यावर भर दिला. यामुळेच हिवरेबाजार मध्ये ग्रामविकासाचे स्वप्न साकार झाले.

गेली 3े वर्ष गावकर्यांनी दगडधोंडें उचलत जे अविरत श्रमदान केले त्या गावकर्यांची मला पद्मश्री पुरस्कार स्विकारताना आठवण झाली. असे प्रतिपादन पवार यांनी केले. पवार यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुधवारी हिवरेबाजार गावाच्यावतीने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मश्री पवार म्हणाले की, क्रिकेटने मला सहनशिलता शिकवली
तीच शिदोरी मला हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडली. येत्या काही वर्षात राज्यात 500 गावे हिवरे बाजार, राळेगणसिध्दी प्रमाणे आदर्श होणार आहेत. असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.













