Mhada News:- स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्याकरिता प्रत्येकजण प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे एक मानसिक समाधानाच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाची गोष्ट असते.
परंतु जर आपण जागा किंवा घरांच्या किमती जर बघितल्या तर या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रत्येकाला स्वतःचे घर खरेदी करणे शक्य होत नाही व त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु अशा लोकांना त्यांचे स्वप्न हे म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करता येते.
आपल्याला माहित आहे की, म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांसाठी सोडत काढली जाते व यामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण व्हायला मदत होते. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर येणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक व्यक्तींचे घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
त्यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली असून यामुळे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत सुमारे 30 लाख घरांची उभारणी करण्यात येणार आहे व महत्त्वाचे म्हणजे यातील जवळपास आठ लाख घरे म्हाडाच्या माध्यमातून उभारली जाणार आहेत.
यामधील सगळ्यात महत्त्वाची व दिलासादायक बाब म्हणजे ही घरे म्हाडा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे व त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येत्या पाच वर्षात अनेकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली आहे व त्यामुळे या परिसरात 2030 पर्यंत सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त घरांची उभारणी करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे व त्यातील सुमारे आठ लाख घरांची उभारणी म्हाडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच ही घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे नक्कीच मध्यमवर्गीयांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. मुंबईमध्ये एमएमआर ग्रोथ हब प्रकल्प या विषयावर म्हाडाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते व या कार्यशाळेमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संदीप जयस्वाल यांनी वरील माहिती दिली.
म्हाडाच्या मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी सुमारे 2000 हेक्टर जमीन म्हाडाच्या अखत्यारीत आहे व त्यामुळे अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातून अनेक घरांची उपलब्धता या ठिकाणी होऊ शकणार आहे.
तसेच पुनर्विकासाकरिता अनेक पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत व त्यामुळे येणाऱ्या काळात गृहनिर्मितीला चालना मिळणार असल्याची माहिती या कार्यशाळेच्या दरम्यान समोर आली आहे.
येणाऱ्या काळामध्ये घराच्या किमती 30% नी कमी करण्यासोबत समुह पुनर्विकासाला चालना देणे तसेच अतिरिक्त सदनिका पुनर्विकासासाठी म्हाडाला देणे व दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाला वाव देणे इत्यादी घटकांमुळे या ठिकाणी मुंबई मंडळातील गृहनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.