10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, अर्ज कुठं करणार, पहा…..

10th Pass Job : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता पुण्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खास बातमी आहे. कारण की, मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड पुणे या ठिकाणी काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी इच्छुकाने पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती अंतर्गत एकूण 78 रिक्त पदे भरली जाणार आहेत. सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड 2, गट C या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्याचे नियोजन आहे. दरम्यान आज आपण या भरती बाबत आवश्यक सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता चालून घेऊया याविषयी सविस्तर.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, नंदूरबार, धुळे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता; भारतीय हवामान विभागाची माहिती

कोणत्या पदासाठी आहे भरती?

या भरतीच्या माध्यमातून सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड 2, गट C या पदाच्या एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे या ठिकाणी गरजेचे आहे.

आवश्यक वयोमर्यादा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार हा 18 ते 25 या वयोगटातील असणे अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पदवीधर उमेदवारांना ‘या’ कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

अर्ज कसा करावा लागेल?

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हा प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – ४११००१ या पत्त्यावर इच्छुकांना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या पदासाठी इच्छुक अन पात्र उमेदवारांना 7 मे 2023 पर्यंत आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. विहित तारखेनंतर पाठवलेला अर्ज कोणत्याच सबबीवर ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद देखील उमेदवाराला घ्यायची आहे.

जाहिरात कुठे पाहता येणार?

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आपण https://drive.google.com/file/d/1TtBQ5HFG-gTcSocTu08X5Wvf4piEkoIo/view या लिंक वर क्लिक करून भरतीची जाहिरात पाहू शकणार आहात. 

हे पण वाचा :- शिंदे सरकारने घोळ संपवला; ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय,…