12th Pass Job : बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनांमध्ये एक मोठी पदभरती आयोजित झाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी तब्बल 2859 जागांवर मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या भरतीबाबत सर्व आवश्यक माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात पण तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात ‘हे’ एक काम कराच लाखोत होणार कमाई; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
कोणत्या पदांसाठी निघाली भरती?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनांमध्ये सोशल सिक्योरिटी सहाय्यक (वर्ग क) पदांच्या 2674, तर स्टनोग्राफरच्या एकुण 185 पदांची भरती आयोजित झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा काय?
सोशल सिक्योरिटी सहाय्यक (वर्ग क) पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य असून त्याने इंग्रजी टायपिंग परीक्षा 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे असून संबंधित प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
स्टनोग्राफर पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्टेनो कौशल्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे देखील बंधनकारक आहे. संबंधित उमेदवार हा 18 ते 27 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. यामध्ये आरक्षित उमेदवाराला वयोमर्यादित सुट राहणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा बाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पात्र उमेदवार https://recruitment.nta.nic.in/EPFORecruitment/Page/Page?PageId=1&LangId=P या लिंक वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस सुरू झाली असून 26 एप्रिल पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत ट्रेन नंतर आता शिर्डी जाणाऱ्या भाविकांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार ! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….