50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून प्रोत्साहन अनुदानाचा (Subsidy) मुद्दा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता गत महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचे ठरवले.
या अनुषंगाने तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत अनुदान (Anudan) स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करतांना सरकार समोर वेगवेगळ्या अडचणी आल्या शेवटी महाविकास आघाडी सरकार पडले आणि आता सत्तेत आलेल्या नवोदित शिंदे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आता प्रत्यक्षात देण्यास सुरुवात केली आहे.
या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ वितरण शुभारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी सार्वजनिक झाली असून यादी मध्ये नाव आलेल्या शेतकरी बांधवांना (Farmer) आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत (Yojana) प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 3 लाख 69 हजार 140 शेतकऱ्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या नावापैकी पहिल्या यादीत सातारा जिल्ह्यातील 84 हजार 108 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या माहितीनुसार पहिल्या यादीत नाव आलेल्या एवढ्या शेतकऱ्यांपैकी 82 हजार 435 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. म्हणजे दोन हजाराच्या आसपास शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे.
या एवढ्या शेतकऱ्यांना अंदाजित 290.23 कोटी रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच यामुळे दिवाळीच्या पर्वावर सातारा जिल्ह्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.