7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात आहे. एप्रिल 2025 मध्ये देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, तेलंगाना या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका करण्यात आला असून या सर्व राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
यामुळे आता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना सध्या किती महागाई भत्ता मिळतोय ?
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सध्या 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा जमा होणार आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तेलंगाना छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे.
सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून याबाबतचा निर्णय पुढल्या महिन्यात होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे. जून ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो.
खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की तीन ते चार महिन्यांनी साधारणतः राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो आणि यामुळेच पुढील महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
तथापि या संदर्भात अजून तरी कोणतेच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय नेमका कधीपर्यंत घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.