8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे आठव्या वेतन आयोगाबाबत. खरंतर केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू आहे. यामुळे नवीन आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा फायदा होणार आहे.

नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे तर निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन वाढणार आहे. दरम्यान आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन कितीने वाढणार याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फिटमेंट फॅक्टरनुसार ठरणार पेन्शन
सध्याच्या सातवा वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2.57 एवढा फिटमेंट फॅक्टरं लागू करण्यात आला आहे. मात्र नव्या वेतन आयोगात म्हणजेच आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरं 1.92 किंवा 2.28 इतका होणार असा अंदाज आहे. दरम्यान याच फिटमेंट फॅक्टरंच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन ठरणार आहे.
किती वाढणार पेन्शन?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याच्या सातवा वेतन आयोगातून 2000 रुपये ग्रेड पेवर निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 13,000 रुपये इतकी पेन्शन मिळत आहे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात जर 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पेन्शन 24,960 रुपये आणि 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पेन्शन सुमारे 27,040 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
शिवाय, लेव्हल 3 किंवा 4 मध्ये येणाऱ्या सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे सध्याची पेन्शन 16 हजार रुपये एवढी आहे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात ही पेन्शनची रक्कम 30,720 पर्यंत पोहोचू शकते.
4,200 रुपये ग्रेड पेवर म्हणजेच लेव्हल 6 वरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगातून 28 हजार 450 रुपये पेन्शन मिळत आहे, मात्र नव्या वेतन आयोगात जर 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पेन्शनची रक्कम 54,624 रुपयांपर्यंत वाढू शकते आणि जर 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाला,
तर पेन्शनची रक्कम 59,176 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तथापि, पेन्शन धारकांची पेन्शन नव्या आठव्या वेतन आयोगात किती वाढणार हे सार काही नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.