8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के एवढा केला. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली.
याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला गेला. दरम्यान आता महागाई भत्ता वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा नवीन वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 8 व्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चा आता पुढे सरकत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्रात जें नवीन सरकार येईल ते नवीन सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आठवा वेतन आयोगाची स्थापना करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत लागू झालेल्या वेतन आयोगाचा इतिहास पाहिला तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता. यानंतर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 साली लागू करण्यात आला होता.
म्हणजेच आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता नवीन आठवा वेतन आयोग हा 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. मात्र आठवा वेतन आयोगासाठी च्या समितीची स्थापना वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच करावी लागणार आहे.
अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये जे नवीन सरकार सत्तेवर येईल ते आठवा वेतन आयोगाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती वाढणार पगार ?
जर 8 वा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. खरेतर पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर मोठी भूमिका बजावते. सध्याच्या सातवा वेतन आयोगांतर्गत 2.57 पट फिटमेंट फॅक्टर नुसार पगार दिला जात आहे.
आता आठव्या वेतन आयोग अंतर्गत मात्र हा फिटमेंट फॅक्टर आणखी वाढणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आठवा वेतन आयोग जेव्हा लागू होईल तेव्हा हा फिटमेंट फॅक्टर 3.68 एवढा होणार आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18000 वरून वाढून थेट 26 हजारावर जाणार आहे.
8th Pay Commission केव्हापासून
आठवा वेतन आयोगाबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार का ? हे तर येणारा काळच सांगणार आहे. पण जर आठवा वेतन आयोग लागू करण्याचा विचार झाला तर हा नवीन वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.













