महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली मोठी उलथापालथ सर्वानी पाहिली. आता निवणुकीच्या तोंडावर आणखी काही गौप्यस्फोट होत आहेत. यातून देखील धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मला उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी काही गोष्टींना हात घातला.
फणवीस म्हणाले..
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यांनी मला मुख्यमंत्रीपदची ऑफर दिली, असे म्हणत तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले. परंतु त्यावेळेस वेळ निघून गेली होती.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही एकत्र आल्याचे चित्र स्पष्ट झाल्यावर सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी, तुम्ही त्यांना सोबत का घेत आहात? पद का देत आहात? मी सगळा पक्ष घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा, बाकी सगळं आपण नीट करू असे ते म्हणाले होते असा राजकीय गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
मिलींद नार्वेकरांनी फोन लावला अन..
मिलिंद नार्वेकरांनी मला फोन केला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी संवाद साधला. मी त्यांना सांगितले की, उद्धवजी, वेळ निघून गेली असून आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही आता थेट वरिष्ठांशी चर्चा करा.
माझ्या पातळीवर हा निर्णय संपला असल्याने मी काही करू शकत नाही. आता सोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की नाही, याची मला कल्पना नसल्याचे ते म्हणाले.
संविधान बदलणार ?
विरोधकांनी भाजपवर संविधान बदलवणार असल्याचा आरोप केलाय. फडणवीस यांनी विरोधकांना याबाबत प्रत्युत्तर दिले आहे. जे तज्ज्ञ आहेत, त्यांना संविधान बदलता येणार नसल्याची कल्पना आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही राज्यघटनेला हात लावता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. जनतेत जाऊन वारंवार ही गोष्ट सांगितल्याने संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.