8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक सध्या नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. खरंतर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. 16 जानेवारी रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून आता लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे.
याच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे जवळपास फायनलाईज झाली आहेत आणि लवकरच या पॅनलचे गठन होईल आणि त्यापुढील कारवाई सुरू होईल अशी आशा आहे. दरम्यान त्याआधीच आठवा वेतन आयोग कधीपर्यंत लागू शकतो या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.

दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला. यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आलाये. यानुसार सहावा वेतन आयोग 2006 मध्ये आणि सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आहे.
1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असून आता 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होणार आहे. म्हणजेच नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे.
पण, आठवा वेतन आयोगाच्या मंजुरीला आता जवळपास चार ते पाच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. पण अजूनही आयोगाची स्थापना झालेली नाही, मात्र यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया सुरु आहे. अजूनपर्यंत आयोगाची स्थापना झालेली नाही, शिवाय टर्म्स ऑफ रेफरेंस देखील ठरवले नाहीयेत.
त्यामुळे एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल अशी शक्यता कमीच आहे. जाणकार सांगतात की 2026 च्या शेवटी किंवा 2027 मध्ये नवीन आठवा वेतन आयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होणार आहे.
मात्र असे असले तरी नवीन आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासूनच लागू होणार आहे म्हणजे सातवा वेतन आयोग प्रमाणेच आठवा वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.
पगार किती वाढणार ?
तज्ञ सांगतात की, आठवा वेतन आयोगात पगार कितीने वाढणार हे सर्वस्वी फिटमेंट फॅक्टवरवर अवलंबून असेल. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत असू शकतो. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका आहे.
सातव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी सात हजार रुपयांवरून वाढून 18 हजार रुपये झाली होती आणि आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 एवढे होणार आहे, यामुळे बेसिक सॅलरी सुद्धा 51 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तथापि याबाबतची अधिकृत माहिती आयोगाच्या शिफारशीनंतर समोर येणार आहे.