अवघ्या ४ तासात शेतकरी बनला करोडपती ! औषध घेण्यासाठी गेला अन नशीबच पालटले

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : ‘नशीब ही फार विचित्र गोष्ट आहे, कधी पलटी मारेल हे सांगता येत नाही असं लोक म्हणताना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. उप्परवाला जब भी देता देता छप्पर फाडके अशीही एक म्हण आपल्याकडे आहे.

परंतु असं कधी तुमच्या बाबतीत घडलं आहे का? आता आम्ही तुम्हाला येथे असच एक उदाहरण देणार आहोत की तो शेतकरी अवघ्या ४ घंट्यात करोडपती बनला.

पंजाबमधील होशियारपूर येथील हा शेतकरी आहे. बाजारात जाऊन औषध खरेदी केली आणि त्यानंतर ४ तासांत तो करोडपती झाला. या व्यक्तीने आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्य मध्यमवर्गीय जीवनशैलीत घालवले आहे.

आता पहिल्यांदाच त्याचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. श्रीमंतीही छोटी नसून करोडो रुपयांची आहे. त्याच्या नावावर तब्बल अडीच कोटी रुपयांचे बंपर बक्षीस लागले आहे.

शीतल सिंग ४० वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता

शीतल सिंह होशियारपूर जिल्ह्यातील माहिलपूर शहरातील रहिवासी आहे. शीतल सिंह यांनी सांगितले की, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना दर आठवड्याला होशियारपूरला औषधे घेण्यासाठी यावे लागत होते.

शनिवारी, ४ नोव्हेंबर रोजी त्यांनी ४० वर्षांपासून खरेदी करत असलेल्या स्टॉलवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तिकिटे खिशात ठेवले, औषधे घेतली आणि दुपारी तीनच्या सुमारास घरी परतले. यानंतर सायंकाळी सात वाजता लॉटरीस्टॉलच्या मालकाने फोन करून बंपर बक्षिसाची माहिती त्यांना दिली.

शीतल सिंह म्हणाले की, लॉटरी स्टॉल मालकाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता, म्हणून दोन रात्र आणि एक दिवस घालवल्यानंतर ते सोमवारी मित्रांसोबत होशियारपूरला पोहोचले. इथं आल्यावर स्वतः त्यांने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

या मालमत्तेचे काय करणार, असे विचारले असता शीतल सिंग यांनी सांगितलं की, ‘मी अल्पभूधारक शेतकरी आहे. याच शेतात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यांनी आपल्या दोन मुलांचे लग्न याच शेतीचा जीवावर लावून दिले.

आता कुठं आणि किती पैसे खर्च करायचे हे घरच्यांशी चर्चा करूनच ठरवलं जाईल. दुसरीकडे लॉटरी स्टॉलच्या मालकाचे म्हणणे आहे की, पूर्वी त्याचे वडील लॉटरी तिकीट विकत असत आता ते स्वत: गेल्या १५ वर्षांपासून लॉटरीची तिकिटे विकत आहेत. त्यांच्या स्टॉल वरील शीतलसिंह हे तिसरे कोट्याधीश विजेते आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe