कोल्हापूरच्या शेतकऱ्याने तर किमयाच केली! तीन एकरमध्ये घेतले तब्बल 360 टन उसाचे उत्पादन; 50 ते 55 कांड्यांचा आहे ऊस

तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलेही पीक कुठल्याही जमिनीमध्ये आणि कुठल्याही भागांमध्ये उत्पादित करणे व भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य व्यवस्थापनाने शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेऊ लागले असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा देखील मिळवत आहेत.

Ajay Patil
Published:
sugarcane crop

Sugarcane Crop Farming:- तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलेही पीक कुठल्याही जमिनीमध्ये आणि कुठल्याही भागांमध्ये उत्पादित करणे व भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य व्यवस्थापनाने शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेऊ लागले असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा देखील मिळवत आहेत.

यामध्ये जर आपण ऊस या पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर हे भारी जमिनीत येणारे आणि जास्त पाणी लागणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व अधिकाधिक साखर कारखाने देखील पश्चिम महाराष्ट्रात आहेत.

या ठिकाणी बहुतेक शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनामध्ये हातखंडा असल्याचे आपल्याला दिसून येते. आधी याच पद्धतीने जर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील लाटवडे येथील प्रगतिशील शेतकरी शंकर पाटील यांचे उदाहरण घेतले तर त्यांच्या ऊस शेतीची सध्या परिसरात नाही तर

संपूर्ण राज्यात चर्चा असून या शेतकऱ्याने मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले असून एक ऊस प्रामुख्याने 50 ते 55 कांड्या म्हणजेच पेरा असणारा लांबलचक असा आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे उसाचे उत्पादन अवघ्या 16 महिन्यांमध्ये घेतले आहे.

कोल्हापूरच्या या शेतकऱ्याने तीन एकर मध्ये घेतले 360 टन उसाचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा म्हटला म्हणजे या ठिकाणी ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याच कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे सध्या ऊस पिकाच्या बाबतीत संपूर्ण राज्यात चर्चा होत असून त्यांच्या शेतातील ऊस पाहण्यासाठी एकच शेतकऱ्यांनी गर्दी केल्याची सध्या चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या लाटवडे येथील प्रसिद्ध आणि प्रयोगशील शेतकरी शंकर पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत व पहिल्यापासून त्यांना शेतीचे देखील मोठी आवड असल्याने ते कायम शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात व त्यांनी आतापर्यंत द्राक्षापासून तर पपई व केळीचे भरघोस असे उत्पादन मिळवलेले आहे.

अगदी याच पद्धतीने उसाचे देखील विक्रमी उत्पादन घेण्याच्या उद्देशाने त्यांनी जुलैमध्ये उसाचे 86032 या वाणाची लागवड करण्याचे ठरवले व बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लागवड केली. आज योग्य व्यवस्थापन ठेवून त्यांच्या शेतामध्ये तब्बल 50 ते 55 पेरी म्हणजेच कांड्या असलेल्या उसाचे उत्पादन त्यांना मिळाले असून हा ऊस 16 महिन्यात तयार झाला आहे.

उत्तम नियोजन ठरले फायद्याचे
एकूण तीन एकर मधील उसाचे उत्पादन जर बघितले तर गुंठ्याला तीन टन उत्पादन त्यांना मिळाले आहे. जास्त आणि जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार उसाचे उत्पादन त्यांना मिळाले असून एक ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागत आहे. विशेष म्हणजे तीन एकरामध्ये संपूर्ण क्षेत्रात हा एकसारख्या उसाचे उत्पादन त्यांनी घेतले असून तब्बल 360 टन उत्पादन त्यांना मिळणार आहे.

याकरता लागवड करताना त्यांनी एकरी बेचाळीस हजार उसाच्या रोपांची संख्या राहणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने ऊसाची संख्या मोजून घेतली व योग्य पद्धतीने मशागत तसेच खतांच्या मात्रा वेळच्यावेळी देण्यावर भर दिला. तसेच उत्तम पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन ठेवले व त्याचाच परिणाम म्हणून त्यांना एकरी 120 टन उत्पादनाची हमी मिळाली.

त्यांच्या या तीन एकर शेतामध्ये 50 ते 55 पेरांचा लांबलचक ऊस सध्या वाढला असून ऊस शेती परवडत नाही अशा म्हणणाऱ्यांसाठी हे त्यांनी उत्तम उदाहरण ठेवले आहे. शेतीचे योग्य व्यवस्थापन ठेवले तर भरघोस उत्पादन मिळते व आर्थिक फायदा देखील चांगला मिळतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe