रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी घर घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाने जाहीर केली 12000 घरांसाठी लॉटरी, वाचा संपूर्ण वेळापत्रक

म्हाडाच्या मुंबई मंडळांने घरांसाठीची सोडत प्रक्रिया जवळपास पूर्ण केलेली असून आता त्या पाठोपाठ कोकण मंडळाकडून  रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग,टिटवाळा, पालघर, ठाणे आणि कल्याण इत्यादी ठिकाणाच्या विविध गृहनिर्माण योजनेसाठी 12636 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देण्यात आली असून या एकूण 12,636 घरांपैकी 11,187 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Published on -

स्वतःचे घर असणे हे स्वप्न असते व त्यातल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये आपले छानसे घर असणे ही एक खूप समाधानाची बाब प्रत्येकासाठी असते. परंतु शहरांमध्ये काय पण ग्रामीण भागामध्ये देखील घर बांधणे किंवा घर घेणे सध्याच्या कालावधीत सोपी गोष्ट राहिलेली नाही.

महागाईच्या कालावधीमध्ये जवळजवळ घर घेणे ही बाबा सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. परंतु म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मात्र पुणे असो किंवा मुंबई आणि इतर शहरांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य असते.

आपल्याला माहित आहे की या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सोडत प्रक्रियेद्वारे घर मिळवता येते. याकरिता म्हाडा कडून सोडत प्रक्रिया राबवली जाते व या प्रक्रियेच्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या अनुषंगाने जर बघितले तर नुकतेच म्हाडाच्या मुंबई मंडळांने घरांसाठीची सोडत प्रक्रिया जवळपास पूर्ण केलेली असून आता त्या पाठोपाठ कोकण मंडळाकडून  रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग,

टिटवाळा, पालघर, ठाणे आणि कल्याण इत्यादी ठिकाणाच्या विविध गृहनिर्माण योजनेसाठी 12636 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देण्यात आली असून या एकूण 12,636 घरांपैकी 11,187 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे याकरिताची अर्ज तसेच नोंदणी भरणा प्रक्रिया शुक्रवारी 11 ऑक्टोबर पासून दुपारी साडेबारा वाजता गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत केली गेली आहे.

 कसे राहील म्हाडाच्या या कोकण मंडळाच्या सोडतीचे स्वरूप आणि वेळापत्रक?

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 12636 घरांच्या विक्री करिता जाहिरात देण्यात आली असून यातील 11187 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजने अंतर्गत उपलब्ध केली गेली आहेत. याकरिताची अर्ज प्रक्रिया तसेच नोंदणी भरणा प्रक्रिया  शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून सुरू करण्यात आलेली आहे.

राबविण्यात येणारी ही सोडत साधारणपणे संगणकीय प्रणाली  आणि एप्लीकेशनच्या सहाय्याने 1439 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. इतकेच नाही तर अर्जदार अँड्रॉइड किंवा आयओएस प्रणालीच्या साह्याने देखील अर्ज डाऊनलोड करू शकणार आहेत., https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहेत.

या सोडतीमध्ये अर्जदार दहा डिसेंबरच्या रात्री अकरा वाजून 59 मिनिटापर्यंत सहभाग नोंदवू शकतात. तसेच 11 डिसेंबर रात्री 11:59 पर्यंत अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे. जे अर्जदार सर्व कागदपत्रांची पूर्तता करतील असे अर्जदार या प्रणाली द्वारे पात्र ठरवले जातील.

या सोडतीसाठी जे अर्ज पात्र ठरतील त्यांची प्रारूप यादी 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर मात्र 20 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदवता येणार आहेत.

या सोडतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 11,187 घरे उपलब्ध असून याकरिता म्हाडाच्या वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून घरांसाठी अर्ज करायचा आहे.

यामध्ये 24 डिसेंबर 2024 रोजी सोडतीत ज्यांनी सहभाग घेतलेला आहे अशा अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल व 27 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे. या सोडतीचा जो काही निकाल असेल तो मोबाईलवर एसएमएस तसेच ई-मेल व एप्लीकेशन च्या माध्यमातून त्वरित मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News