Ajab Gajab News : स्वस्तात मिळतोय एक हजार वर्षांपूर्वीचा किल्ला !

Published on -

Ajab Gajab News : ब्रिटनमधल्या हेअरफोर्डशायर येथील विगमोर किल्ला अगदी स्वस्तात विक्रीला काढण्यात आला आहे. एक हजार वर्षांपूर्वीचा हा किल्ला स्वस्तात विकण्यामागे कारण म्हणजे किल्ल्यावर आता छतच उरलेले नाही.

सुरुवातीला पावणेसहा कोटी रुपयांना किल्ला विकण्याचे मालकाने ठरवले; परंतु भग्नावशेषांसाठी एवढी मोठी किंमत कुणी मोजायला पुढे आले नाही. त्यामुळे किंमत कमी करण्यात आली.

आता किल्ला पावणेपाच कोटींना उपलब्ध आहे. रक्कम कमी केल्यानंतर सहा महिने उलटले तरी किल्ला खरेदी करायला कुणीही आलेले नाही. किल्ल्याभोवती जंगल आणि मैदान आहे.

जागेवर असलेल्या कोठार कार्यशाळेचे रूपांतर दोन बेडरूमच्या घरात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इंग्लिश हेरिटेजने ९५६ वर्षे जुन्या किल्ल्याकडे जाण्याच्या रस्त्याचा हक्क राखला आहे. ब्रिटनच्या कायद्यानुसार, परराष्ट्र मंत्र्यांच्या पालकत्वाखालील कोणतीही मालमत्ता जनतेसाठी खुली केली गेली पाहिजे.

इंग्लिश हेरिटेजचा असा दावा आहे की, किल्ला विकत घेणारा हे ठरवेल. संडरलैंड इस्टेट एजंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्याच्या किल्ल्याचे दोन बेडरूमच्या घरात रूपांतर करण्यासाठी नियोजन संमतीने मान्यता दिली आहे.

हा किल्ला समृद्ध इतिहासाचा अभिमान बाळगतो आणि ५०० वर्षांहून अधिक काळ अनेक राजे-राण्यांचे यजमानपद भूषवणारे सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून हा किल्ला ओळखला जात होता.

१०६७ मध्ये विल्यम फिट्झ ऑस्बर्न, अर्ल ऑफ हेअरफोर्ड आणि विल्यम द कॉन्कररच्या जवळच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देत खंगत चालला आहे. हेअरफोर्डशायरच्या ग्रामीण भागात वसलेला आणि अनेक बुरुजांचे अवशेष आणि मुख्य भिती असलेला हा किल्ला २९.८४ एकर जागेवर वसलेला आहे.

त्याचे मैदान अनेक दुर्मीळ वनस्पती आणि वन्यजीवांचे निवासस्थान बनले आहे. विगमोर किल्ला एकेकाळी मोर्टिमर घराण्याचा बालेकिल्ला होता; जो सुमारे १०७५ ते १४२५ पर्यंत राजाच्या ताब्यात होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News