भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने काल अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल टाकले असून श्रीहरीकोटा येथून आदित्य एल 1 या अवकाशानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि चांद्रयान तीन च्या यशा नंतर भारताने परत सूर्याच्या अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल उचलले.
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान आणि सौर वाऱ्यांची गती मोजण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सूर्यावर होणारे विविध प्रकारचे स्फोट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटा यांचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने आदित्य मध्ये वापरण्यात आलेला एआय मदत करणार आहे. हे एक महत्वाचे सौर मिशन असून जगाच्या फायद्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास आता आदित्यच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आदित्य एल 1 मोहिमेचे महत्व
सूर्याचा अभ्यास करण्याकरिता आदित्य अवकाशात झेपावले असून हा उपग्रह सूर्याच्या एल वन पॉईंटवर स्थापित केला जाणार आहे. तर आपण या अंतराचा पृथ्वीपासून विचार केला तर चंद्राच्या अंतरापेक्षा चार पट हे अंतर जास्त असून पृथ्वीपासून साधारणपणे पंधरा लाख किलोमीटर इतके आहे. यामध्ये सूर्याचा किरणोत्सर्ग, सौरवायू आणि सौर वादळे यांचा अभ्यास आदित्यच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आदित्य एल 1 ज्या ठिकाणी जाणार आहे त्या पॉईंटला लँग्रेज पॉईंट असे म्हटले जाते. या पॉईंटवर दोन वस्तूंमधील अवकाशातील गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य असते. आपण अंतराळाचा विचार केला तर असे पाच लग्रेज पॉईंट आहेत. आदित्य मध्ये विजीबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ हे उपकरण बसवण्यात आलेले असून ते प्रत्येक दिवसाला सूर्याची १४०० फोटोग्राफ पाठवणार आहे व या फोटोग्राफच्या माध्यमातून इस्रो सूर्यावरील स्थितीचा अभ्यास आणि विश्लेषण करणार आहे. या व्हीइएलसी उपकरणांची निर्मिती इस्रो आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रो फिजिक्सची संलग्न संस्था सेंटर फॉर रिसर्च अँड एज्युकेशन इन सायन्स टेक्नॉलॉजी यांनी केलेली आहे.
आदित्य मिशनची आवश्यकता का होती?
जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सूर्याचे जे काही वातावरण असते त्याचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी संधी असतात. याचा विचार केला तर पाच ते सात मिनिटे यामध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यात जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा अभ्यास या माध्यमातून करता येत नाही. परंतु या मिशनमुळे आता सूर्याचा चांगला अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो.या दृष्टिकोनातून या सौर मिशनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जे काही व्हीएलसी उपकरणे आहेत त्यामुळे आता या दोन्ही गोष्टी आपल्याला कळणार आहे. यातील पहिली म्हणजे आपण पांढऱ्या प्रकाशाखाली प्रतिमा निर्माण करू शकणार आहेत आणि दुसरे म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचे जे काही 5400°c तापमान आहे आणि त्याच्या वातावरणाचे तापमान हे बऱ्याचदा लाखो अंशापर्यंत पोहोचते. अशामध्ये सूर्याची चुंबकीय शक्तीचे ऊर्जत रूपांतर होते असे साधारणपणे मानले जाते.
ही प्रक्रिया कशा पद्धतीने होते याची अद्याप देखील माहिती नाही. परंतु आता आदित्य मध्ये इन्स्टॉल करण्यात आलेल्या व्हीएलसीमुळे याचा शोध घेणे सोपे होणार आहे. आदित्य हे लँग्रेज एक वर स्थापित करण्यात येणार असून या ठिकाणी उपग्रह स्थिर असतात. त्यामुळे उपग्रहांना आवश्यक इंधनाची जास्त गरज नसते व इंधनाचा वापर देखील कमी होतो. यामध्ये आदित्य 178 दिवसांमध्ये एक फेरी पूर्ण करेल परंतु सूर्य त्याच्यापासून दूर जाणार नाही.
साधारणपणे पाच वर्ष आयुष्य काळ असलेला हा उपग्रह यामुळे दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये टिकेल व भरपूर माहिती आणि आकडे इस्रोला उपलब्ध करून देईल. तसेच सौर वादळांचा विचार केला तर पृथ्वीवर पोहोचायला त्यांना फक्त एक ते दोन दिवस लागतात.
परंतु आता या उपकरणामुळे सूर्याची निरीक्षण करता येणार असल्याने सौर वादळ निर्माण झाल्यानंतर त्याची गणना पटकन करता येणे शक्य होणार आहे व ते पृथ्वीवर कधी पोहोचले याचा देखील अंदाज पटकन बांधता येणार आहे. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा उपग्रह बंद करून त्यांना नुकसान होण्यापासून आपल्याला वाचवता येणार आहे.
आदित्य एल 1 मध्ये असलेली उपकरणे काय काय कामे करतील?
1- विजीबल एमीशन लाईन कोरोनाग्राफ– या उपकरणाच्या माध्यमातून सौर वादळे आणि त्यातून बाहेर पडणारी उष्णता यांचा अभ्यास करता येणार आहे.
2- सोलर अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप– त्यामुळे सूर्याचा पृष्ठभाग आणि त्यावरील वातावरणाचे छायाचित्रीकरण आणि सूर्याच्या पृष्ठभागापासून जे काही उष्णता बाहेर पडते तिचे वितरण मोजणे शक्य होणार आहे.
3- आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट आणि प्लाजमा अनालायझर पॅकेज फोर आदित्य– सौर वादळे आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वितरणाचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.
4- सोलर लो एनर्जी एक्सप्रेस स्पेक्ट्रोमीटर आणि हायएनर्जी एल वन ऑरबेटिंग एक्स–रे स्पेक्ट्रोमीटर– सूर्या मधून जे काही क्ष किरण म्हणजेच एक्स-रे बाहेर पडतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर होणार आहे.
5- मॅग्नोमीटर– आंतरग्रहीह चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.