Bullet Train News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पायाभूत सुविधांचा मोठा विकास झाला आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात देशात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची तसेच रेल्वेच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. वंदे भारत सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन देखील भारतात सुरू झाले आहेत. दुसरीकडे भारतात जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे देखील काम सुरू आहे.
भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवली जाणार आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून लवकरच या प्रकल्पाचे शंभर टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 2026 मध्ये सुरू होईल असा देखील दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे देशात आता बुलेट ट्रेनचा आणखी एक मार्ग विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. देशातील ही दुसरी बुलेट ट्रेन राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मिळणार आहे.

कसा असणार रूट
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली ते हावडा दरम्यान देशातील दुसरी बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे या बुलेट ट्रेन चा वेग देखील ताशी 350 किलोमीटर इतका राहणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे दिल्ली ते पश्चिम बंगालमधील हावडा या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. ही बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर दिल्ली ते हावडा हा प्रवास अवघ्या सहा ते साडेसहा तासांमध्ये पूर्ण होणार आहे.
या बुलेट ट्रेन च्या दुसऱ्या मार्गावर एकूण नऊ स्थानके विकसित होणार आहेत. प्रस्तावित दिल्ली हावडा बुलेट ट्रेन प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची लांबी 1669 किलोमीटर इतकी राहणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल पाच लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा दिल्ली ते वाराणसी आणि दुसरा टप्पा वाराणसी ते हावडा असा राहील.
ही स्थानके राहणारं
दिल्ली, आग्रा कॅन्ट, कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनऊ, वाराणसी, पाटणा, आसनसोल आणि हावडा ही 9 स्थानक या प्रकल्पांतर्गत विकसित होणार आहेत आणि या स्थानकांवर या गाडीला थांबा राहणार आहे.