एकच नंबर ! शेतकऱ्याच्या लेकान विपरीत परिस्थितीवर मात केली अन बनला कृषी वैज्ञानिक ; अख्ख्या भारतात आला पहिला

Ajay Patil
Published:
Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्याची पोर आता उच्च शिक्षणात देखील मागे राहिलेले नाहीत. उच्च शिक्षण घेऊन आता शेतकरी पुत्र आपल्या व आपल्या परिवाराचे आपल्या राज्याचे नाव संपूर्ण देशात, जगात रोशन करत आहेत. आज आपण देखील अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना देखील कृषी वैज्ञानिक बनण्याची किमया साधली आहे.

यामुळे या पट्ट्याची जोरदार चर्चा रंगली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दाबगाव मक्ता येथील आकाश रवींद्र चिचघरे यांची ही प्रेरणादायी कहानी. आकाश जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेत आणि आज एस एस आर बी च्या परीक्षेत ओबीसी मध्ये भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे. आकाश आता कृषी वैज्ञानिक म्हणून रुजू होणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषी वैज्ञानिक आकाश यांचे कुटुंब हे देखील शेती करत. त्यांचे वडील शेतकरी असले तरी देखील गवंडीचे काम करतात. दोन एकर शेतीमध्ये संसाराचा गाडा हाकणे मुश्कील असल्याने ते गवंडी काम करतात. त्यांना दोन मुलं, आकाश मोठा असून त्याला शिक्षणाची मोठी आवड. यामुळे वडिलांनी देखील शिक्षणासाठी कायमच प्रेरित केले.

आकाश यांनी सुरुवातीचं शिक्षण झेडपीच्या शाळेत आपल्या गावातच घेतलं. यानंतर त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय तळोधी या ठिकाणी नंबर लागला. त्या ठिकाणी त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे बीएससी वनविद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर एम एस सी चा शिक्षण त्यांनी वाराणसी या ठिकाणी घेतलं.

वाराणसीच्या हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी हे शिक्षण घेतले. यानंतर पीएचडी करण्यासाठी केरळ येथील एग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी गाठले. या ठिकाणी त्यांनी वनस्पती चारा या विषयावर पीएचडी सुरु केली. आकाश यांनी मध्यंतरी दोन महिने वन उत्पादकता संस्थान रांची या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे काम करत असतानाही त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच होता.

आकाशन मग २०२१ मध्ये अग्रीकल्चर सायटिक रिक्यूटमेंट बोर्ड (एएसआरबी) ची परीक्षा दिली. या परीक्षेत अखेर तो घवघवीत यश संपादित घेऊन यशस्वी झाला आहे. एएसआरबीच्या परीक्षेत आकाश ओबीसी गटातून जिल्ह्यातून प्रथम आला आहे. खरं पाहता आकाशची घरची परिस्थिती खूपच नाजूक. कुटुंब आर्थिक दृष्ट्या अक्षम असल्याने आणि उच्च शिक्षणासाठी मोठमोठ्याला शहरात अधिकचा पैसा लागत असल्याने घरून मिळणाऱ्या पैशांवर आकाशचे शिक्षण पूर्ण झालंचं नसतं.

मात्र याच दरम्यान त्यांना शिष्यवृत्तीचा आधार मिळाला. सन २०१८ मध्ये त्यांनी आयसीएआरएसआरएफची शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर मग पुन्हा सन २०१९ मध्ये युजीसी जेआरएफची शिष्यवृत्ती पटकावली अन अशा तऱ्हेने शिष्यवृत्तीचा आधार घेत त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवलं. निश्चितच एस एस आर बी च्या परीक्षेत सबंध भारतातून ओबीसी प्रवर्गातून पहिला येत आकाशने कष्टाच चीज करून दाखवल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe