Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप बदल पाहायला मिळत आहेत. जिथे गेल्या काही दशकांपूर्वी हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी देखील देशातील संशोधकांना तसेच शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागत होती, त्या देशात आता तंत्रज्ञानाने मोठी गरुडझेप घेतली असून आता हवामान अंदाज तंतोतंत असा वर्तवला जात असून आता देशातील संशोधकांनी यापुढे पाऊल टाकल आहे.
महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथे स्थित असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेने असा एक भन्नाट ॲप्लिकेशन विकसित केला आहे ज्याच्या मदतीने चक्क वीज केव्हा पडेल हे वर्तवलं जात.

यां एप्लीकेशनच्या माध्यमातून वीज पडण्याच्या अर्धा तास अगोदर माहिती देण्यात येते. विशेष म्हणजे हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध असून याच्या मदतीने शेतकरी बांधवांना वीज केव्हा पडेल याची माहिती मिळणार आहे.
शेतकऱ्यांना अनेकदा शेती करताना काही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. यामध्ये मग अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा समावेश होतो. याशिवाय शेतकऱ्यांना वीज कोसळण्याच्या घटनेचा देखील फटका बसत असतो. अनेकदा वीज पडल्याने मानवाची जीवित हानी होत असते, पशुधनाची हानी होत असते परिणामी शेतकऱ्यांना मोठा लॉस सहन करावा लागतो.
मात्र पुण्याच्या या संस्थेने विकसित केलेले हे भन्नाट ॲप्लिकेशन व्हीच कोसळण्याच्या अर्धा तास अगोदर अँप्लिकेशन वापरणाऱ्या व्यक्तीला सुचित करत असल्याने वीज कोसळल्यामुळे होणारे हे दुष्परिणाम कुठे ना कुठे टाळता येणे शक्य होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय मेट्रोलॉजी संस्था यांनी दामिनी नावाचं एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे.
हे अँप्लिकेशन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. शेतकरी बांधव हे ॲप्लिकेशन आपल्या स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करून विजा पडण्याच्या अर्धा तास आधी अलर्ट मिळवू शकणार आहेत. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्यांच्या शेतात किंवा आजूबाजूच्या 10 किमीच्या शेतात वीज पडण्याची शक्यता असल्यास संबंधित एप्लीकेशन वापरणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर ऑडिओ संदेश किंवा एसएमएस अलर्ट पाठविला जातो.
यामुळे शेतकरी अगोदरच सावध होऊन आपली पिके वाचवण्यासाठी, आपले पशुधन वाचवण्यासाठी, विशेष म्हणजे स्वतःला संरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करू शकणार आहेत. निश्चितच भारतीय शेती आता पूर्णपणे हायटेक बनली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर शेतकरी बांधवांच्या पिकाची, पशुधनाची आणि त्यांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी उपयोगी ठरत आहे. दामिनी एप्लीकेशन हे याच गोष्टीला अधोरेखित करत आहे.
शेतकरी मित्रांनो दामिनी अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini