Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील संशोधकांकडून तसेच शास्त्रज्ञाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे संशोधन कार्य केले जाते.
अशातच आता उत्तर प्रदेश राज्यातील एका अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने असंच काहीसं नाविन्यपूर्ण संशोधन केलं आहे. या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला वॉश करण्यासाठी एक अद्भुत यंत्र तयार केला आहे. याच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि पाण्याचा अपव्यय टाळून भाजीपाला धुता येणार आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्याच्या ओनम सिंग नामक एका विद्यार्थ्याने हे खास यंत्र बनवल आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मिर्झापूर जिल्ह्यातील गुरुनानक इंटर कॉलेजमध्ये शिकणारा ओनम सिंग याने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला वॉशिंग मशीन विकसित केला आहे.
ओनम सध्या अकरावीचे शिक्षण घेत असून त्याने विकसित केलेल्या या भाजीपाला वॉशिंग मशीनच्या सहाय्याने कमी वेळेत आणि पाण्याचा कमी वापर करून भाजीपाला धुता येणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांवर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या जिल्हाधिकार्यांनी ओनम याचे एक प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
एवढेच नाही तर आयआयएम अहमदाबादकडूनही ओनमच्या या कार्यासाठी त्याचा गौरव केला जाणार आहे. निश्चितच, योग्य मार्गदर्शन आणि आपल्या ज्ञानाचा योग्य वापर केला तर कमी वयातही लोकहिताचे संशोधन केले जाऊ शकते हे ओनमने दाखवून दिले आहे.
केवळ एक हजारात तयार केलं भाजीपाला वॉशिंग मशीन
विद्यार्थी ओनम सिंगने सांगितल्याप्रमाणे, त्याला त्याच्या मित्रांनी शेतकऱ्यांना मुळा आणि इतर भाज्या धुण्यास खूप त्रास होतो असं सांगितले. मग काय ओनमला भाजीपाला वॉशिंग मशीन बनवण्याचे कल्पना सुचली. मग त्याने दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे भाजीपाला धुण्यासाठी मशीन तयार केलं. यासाठी एक हजार रुपये खर्चं आला. या मशीनमध्ये बादली, मोटार पंप, वायर, प्लास्टिकची टोपली, पाईप व नळ यांचा वापर करण्यात आला आहे.
आता हे मशीन शेतकऱ्यांच्या कामी यावे या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची त्याची योजना आहे. यासाठी बीएचयूच्या कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा केली जात असून कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने मदतीने या मशीनमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे. निश्चितच अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं असून यामुळे शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे.