शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Ajay Patil
Published:
Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते.

मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर करण्यासाठी जवळपास जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे.

वास्तविक शासनाकडून जून महिना उजाडला तरी हमीभाव जाहीर होत नव्हता यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. मात्र आज अखेरकार केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. 

हे पण वाचा :- आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने नुकतेच आधारभूत किंमतींच्या शिफारशी केंद्र सकारला सादर केल्या होत्या. यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने आधारभूत किमतींना मान्यता दिली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी यंदा खरीप हंगाम 2023 24 च्या हमीभावात भरीव वाढ करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. आता आपण केंद्र शासनाने कोणत्या पिकाच्या हमीभावात किती वाढ केली आहे यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….

2023-24 मध्ये कसा राहणार हमीभाव?

  • सोयाबीन :- 4600 रुपये प्रति क्विंटल 
  • कापूस मध्यम धागा :- 6620 रुपये प्रति क्विंटल
  • कापूस लांब धागा :- 7 हजार 20 प्रति क्विंटल 
  • तूर :- सात हजार रुपये प्रतिक्विंटल
  • मूग :- 8 हजार 58 रुपये प्रति क्विंटल
  • उडीद :- 6,950 रुपये प्रतिक्विंटल

 

गेल्या हंगामात काय होता हमीभाव?

  • सोयाबीन :- 4300 रुपये प्रति क्विंटल
  • कापूस मध्यम धागा :- सहा हजार 80 रुपये प्रति क्विंटल
  • कापूस लांब धागा :- 6380 प्रति क्विंटल 
  • तूर :- 6,600 रुपये प्रति क्विंटल
  • मुंग :- 7,755 प्रतिक्विंटल
  • उडीद :- 6,600 रुपये प्रतिक्विंटल 

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe