Agriculture News : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नाफेडकडून तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. खरं पाहता जिल्ह्यात तूर लागवडीचे क्षेत्र मोठे विस्तारलेले आहे. आता देखील तूर लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. एका आकडेवारीनुसार दीड लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची लागवड जिल्ह्यात झाली आहे.
मात्र नाफेड कडून तूर खरेदी केले जात नसल्याने तुर उत्पादक चिंतेत होते. दरम्यान आता नाफेड तूर खरेदीसाठी पुढे आले असून जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. तुरीचे उत्पादन यंदा चांगले झाले आहे मात्र खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट माजवली जात होती. अशा परिस्थितीत नाफेड केव्हा तुरीची खरेदी करतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
अखेर नाफेड ने तूर खरेदीची सात केंद्र जिल्ह्यात सुरू केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. नाफेडची खरेदी सुरू झाली असल्याने खुल्या बाजारात देखील तुरीच्या दरात तेजीचीं शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांना किमान साडेसात हजाराच्या दराची अपेक्षा होती मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना दर मिळत नव्हता.
आता नाफेडचीं खरेदी केंद्र सुरू झाली असल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा तुरीच्या दरात तेजी येण्यासं होऊ शकतो. अशा परिस्थितीत आज आपण नाफेडने जी खरेदी केंद्र सुरू केली आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने नोंदणी करावी लागेल नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे शेतकऱ्यांना लागतील याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकऱ्यांना 6 मार्च 2023 पर्यंत नाफेडच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. नोंदणी करताना शेतकऱ्यांना आधारकार्ड, सात बारा उतारा, पिक पेरा व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत देखील खरेदी केंद्रावर द्यावी लागणार आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
या ठिकाणी आहेत नाफेडचीं खरेदी केंद्र
महागाव तालुका खरेदी विक्री समिती, महागाव.
पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा
झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु)
आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर
दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस
बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.