Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र आपल्या या शेतीप्रधान / कृषीप्रधान देशात आजही शेतकरी बांधव वेगवेगळ्या अडचणींमुळे भरडला जातोय. शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाहीये.
क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग अशा पर्यावरणीय समस्या शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागल्या आहेत. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, जमिनीचे वाढते भाव, मजुरीचे वाढते दर, मातीची कमी होत चाललेली सुपीकता अशा एक ना अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या पुढ्यात वाढून ठेवल्या आहेत.

यामुळे शेती नको रे बाबा असा ओरड सगळीकडे पाहायला मिळतोय. या अशा अडचणी असतानाच राज्यातील काही शेतकऱ्यांना चक्क त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता सुद्धा उपलब्ध नाहीये आणि यामुळे त्यांची आर्थिक, मानसिक अन शारीरिक पिळवणूक होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून शेतात जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध करून दिला जात असून यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय न होऊ देता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतरस्ते उपलब्ध करून दिले जात आहेत. जे शेतकरी असतील त्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता किती मोठ्या प्रमाणात असते? हे ठाऊकच असेल.
शेतात जर रस्ता नसेल तर पाणी, चांगली जमीन, भांडवल, शेतीचे ज्ञान, अनुकूल हवामान हे सगळे असूनही उत्पादन आणि उत्पन्न 50% पर्यंत कमी होऊ शकतो. आणि म्हणूनच जर तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल आणि नव्या रस्त्याची तुम्हाला मागणी करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला जातोय. यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलदार महोदयांकडे अर्ज करावा लागणार आहे.
कारण शेतात नवीन रस्ता हवा असल्यास तुम्हाला तहसीलदारचं नवा रस्ता देऊ शकतात. दरम्यान आता आपण शेतात नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे द्यावे लागतील याची माहिती पाहणार आहोत.
नवीन रस्त्यासाठी ही कागदपत्रे सादर करा
सर्वप्रथम तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाऊन नवीन शेतरस्त्यासाठीच्या अर्जाचा नमुना घ्यावा लागेल.
मग अर्जात अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, चालू मोबाईल नंबर सादर करावा लागणार आहे.
शेजारील शेतकऱ्यांची सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे.
ज्या शेतासाठी रस्ता हवा आहे, त्या शेतजमिनीची सर्व माहिती जसे की गट नंबर, सर्वे नंबर आणि हद्दीतील तपशील, रस्ता कोणत्या जागेवरून हवा आहे, त्याची सविस्तर माहिती द्यावी लागेल.
अर्जदाराच्या शेतजमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्याचा कच्चा नकाशा सुद्धा जोडवा लागेल.
अर्जदाराच्या शेतजमिनीचा भूमी अभिलेखाकडील शासकीय मोजणी नकाशा.
अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील 7/12 उतारा.
रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक लगतच्या सर्व शेतकऱ्यांची संमतीपत्रे व पत्ते.
अशा जमिनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्रांसह कार्यालयास द्यावी.
शेतजमिनीशी संबंधित इतर अन्य कागदपत्रे सादर करावे लागतील.













