Ahilyanagar News : काळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात संग्राम जगताप यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
दोन्ही राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी लढत झाली. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. संग्राम भैय्या जगताप हे काल मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर होते.
पहिल्या राऊंड पासून जगताप यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सर्वच फेऱ्यांमध्ये जगताप हे आघाडीवर राहिलेत अन आपल्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात पुन्हा जगताप यांची जादू चालली हे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यांनी विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणलाय.
त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची हॅट्रिक पूर्ण केली असल्याने मतदारसंघात आता भैया नामदार होणार, त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार असे बोलले जात आहे.
जगताप यांना या निवडणुकीत 1,18,636 आणि कळमकर यांना 79,018 मते मिळालीत. जगतापांनी कळमकर यांचा 39,618 मतांनी पराभव केलाय. दरम्यान, आता आपण जगताप यांच्या विजयाची कारणे पाहणार आहोत.
जगताप का विजयी झालेत?
गेल्या 10 वर्षात केलेली विकासकामे हा जगताप यांचा प्लस पॉईंट. त्यांनी प्रचारात सुद्धा आघाडी घेतली होती. महायुतीच्या नेत्यांनी जगताप यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. त्यांनी स्वतः प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला.
गेल्या काही महिन्यांमध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा देखील जगताप यांच्या लीडमध्ये मोठा वाटा आहे. विशेषता लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांना फायदा झाला. जगताप यांना देखील या योजनेचा फायदा मिळाला.
संग्राम जगताप हे मतदार संघातील तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहेत. तरुण वर्गाचा नेहमीच संग्राम भैया जगताप यांच्याकडे कल राहिला आहे.
संग्राम भैय्या जगताप यांचे मतदारसंघातील लोकांमध्ये वैयक्तिक संपर्क आहे. याचा सुद्धा फायदा त्यांना या निवडणुकीत झालाय.
विरोधकांच्या माध्यमातून जगताप यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. पण या टिकेकडे आणि आरोपांकडे लक्ष न देता त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मतदारांमध्ये आपले विकासाचे व्हिजन मांडले. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा फायदा देखील त्यांना झाला.