Ahilyanagar Railway News : दरवर्षी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जगभरातील वारकऱ्यांचा मोठा मेळा लागत असतो. आषाढी वारीचा हा दिव्य सोहळा खरंच फारच नेत्र दीपक असतो.
दरम्यान जर तुम्हालाही आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी रेल्वे कडून एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने भुसावळ ते पंढरपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.

ही गाडी अहिल्यानगर सह या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांना देखील या गाडीचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने खानदेश आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटतात. यंदाही विठुरायाच्या दर्शनासाठी या भागातील वारकरी मोठ्या प्रमाणात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर रेल्वे कडून भुसावळ ते पंढरपूर दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा मोठा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानावर थांबा घेणार याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.
कसं राहणार नव्या गाडीचे वेळापत्रक?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भुसावळ पंढरपूर अनारक्षित विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक ०११५९ ) ५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर पंढरपूर भुसावळ विशेष एक्सप्रेस ट्रेन ( ट्रेन क्रमांक ०११६० ) ही अनारक्षित विशेष ट्रेन ६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी दुपारी १.०० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीचा खानदेश, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, भुसावळ ते पंढरपूर दरम्यान चालवली जाणारी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील जवळपास 9 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीलाजळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर,
दौंड, कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. नक्कीच नगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे आणि यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बाब राहणार आहे.













