Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे. या यंदाच्या अर्थसंकल्पामुळे सुरत चेन्नई, पुणे औरंगाबाद तसेच नगर मनमाड महामार्गांच्या कामांना वेग येणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी आवश्यक निधीची पूर्तता यंदाच्या बजेट मधून होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातुन जाणाऱ्या या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांसाठी निधीची तरतूद केली जाईल असं तज्ञ लोकांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील चालना मिळणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर नगरकर खूष असल्याचे बोल्ले जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सुरत चेन्नई हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यात 180 किलोमीटर एवढा अंतर कापतो.
साहजिकच हा महामार्ग जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा आहे. म्हणजे या महामार्गाचा संपूर्ण खर्च हा 50 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. दरम्यान आता या महामार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची माहिती देण्यात आली असल्याने निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे पुणे-अहमदनगर-औरंगाबाद या महामार्गसाठी देखील या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
हा महामार्ग देखील जिल्ह्यातून जातो. या मार्गाची लांबी ही 270 किलोमीटर एवढी आहे. हा प्रकल्प जवळपास 5000 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. हा देखील एक महत्त्वाचा प्रकल्प या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध झाला असल्याने मार्गी लागेल अशी शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. याशिवाय नगर-मनमाड या 75 किलोमीटरच्या मार्गासाठी 750 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
म्हणजे हा देखील मार्ग या अर्थसंकल्पामुळे मार्गी लागेल अशी आशा आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यातील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पतून निधीची तरतूद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामासाठी बहुउपयोगी असा ठरणार आहे.