Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची विकास कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा देखील यामध्ये काही मागे राहिलेला नाही. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी महामार्गांची कामे सुरू आहेत तर काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये जिल्ह्यातील बहुचर्चीत अशा बाह्यवळण रस्त्याचा देखील समावेश आहे.
आता या बाह्यवळण रस्त्याबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या बाह्यवळण रस्त्यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर पाच ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
यामुळे अहमदनगरच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. हा बाह्य वळण रस्ता नगर शहराबाहेर विकसित केला जात असून या रस्त्याचे 55 टक्के काम पूर्णत्वास आले आहे.
या रस्त्यावर जे पाच उड्डाणपुले उभारले जात आहेत त्यांचे देखील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा बाह्यवळण रस्ता 40 किलोमीटर अंतराचा राहणार आहे. यामुळे पुणे दौंड सोलापूर कल्याण जामखेड या ठिकाणाहून नगरकडे येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा मार्ग शहरा बाहेर उभारला गेला असल्याने नगरमध्ये 70% वाहतूक कमी होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असून यामुळे वाहतूक कोंडीला कुठे ना कुठे लगाम बसेल असे देखील जाणकारांचे म्हणणे आहे.
खरं पाहता, अहमदनगर जिल्ह्याला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर अशी दोन धार्मिक स्थळे आहेत ज्या ठिकाणी संपूर्ण देशभरातून धार्मिक लोक येत असतात. अशा परिस्थितीत उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, कश्मीर, राजस्थान व दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, हैदराबाद या राज्यातून येणारे भाविक नगर शहरामार्गे शिर्डी आणि शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळी भेटी देतात.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
परिणामी शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा मार्ग हाती घेतला आहे. हा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नगर शहरातील वाहतूक कमी होणार आहे. दरम्यान या बाह्यवळण रस्त्यावर पुणे-संभाजीनगर, कल्याण-नगर, दौंड-नगर, सोलापूर-नगर, जामखेड-नगर रस्त्यावर हे पाच उड्डाणपूल असणार आहे पाच उड्डाणपुले राहणार असून त्यांचे 60 टक्के कामे पूर्ण झाले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नगर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगाव या ठिकाणी बाह्यवळण रस्त्यावर दोन उड्डाणपूल तयार केली जाणार आहेत. खरं पाहता नगरहून फलटण, बारामतीकडे जाणाऱया महामार्गावरून नगर-आष्टी रेल्वे मार्ग गेल्यामुळे तेथे रेल्वेचा उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. तर अरणगाव सोडल्यानंतरच्या पहिल्या चौकात राष्ट्रीय महामार्गाचा एक उड्डाणपूल राहणार आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी दोन उड्डाणपूल राहतील.
तसेच या बाह्यवळण रस्त्याच्या लगत अजून एक दहा किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग देखील बनवला जात आहे. जो की वाळुंज फाटा ते शहापूर पर्यंत राहणार आहे. हा ग्रीन फील्ड महामार्ग पाथर्डी रस्त्याला कनेक्ट होणार आहे. दरम्यान बाह्यवळण रस्त्याचे काम पाहणारे इंजिनीयर दिग्विजय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हाती घेण्यात आलेल्या रस्त्यावर पाच उड्डाणपुल आहेत.
ज्यावर स्लॅब व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलामुळे या रस्त्याद्वारे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा अनमोल वेळ वाचणार आहे. या उड्डाणपुलाचे व बाह्यवळण रस्त्याचे काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे देखील या अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. साहजिकच जुलै अखेर हा महामार्ग पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रवाशांना वाहतुकीसाठी खुला होईल. एकंदरीत या बाह्य वळण रस्त्यामुळे नगर शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कुठे ना कुठे हा रस्ता फायदेशीर ठरणार आहे.