Ahmednagar Ration Card Holder : राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच गरीब जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा शासकीय योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेचे हित जोपासण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होते.
दिवाळीच्या पर्वावर महाराष्ट्र राज्य शासनाने अशीच कौतुकास्पद अशी योजना आखली होती. शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीमध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देऊ केला होता.
दरम्यान त्यावेळी आनंदाचा शिधा गरीब जनतेसाठी सणासुदीला दिलासा देणारा ठरला होता. यामुळे सरकारची मोठी वाहवा झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे फडणवीस सरकारने आपली ही योजना गुढीपाडवा आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीला देखील लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा :- तुम्हालाही सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाही का? मग ‘या’ ठिकाणी करा तक्रार
गुढीपाडव्याला आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर जयंतीला शंभर रुपयात राज्यातील रेशन कार्ड धारकांना साखर, चणाडाळ, रवा प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.खरं पाहता गुढीपाडव्यालाच हा शिधा मिळणार होता पण आता एक एप्रिल पासून याची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाची आता धावपळ सुरू झाली आहे.
यामुळे आता एप्रिल महिन्यात हा शिधा रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 30 लाख जनतेला यामुळे फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गुढीपाडवा व डॉ. आंबेडकर जयंती या सणासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ‘आनंदाचा शिधा’ इॅ-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार तिकीट दरात मोठी सवलत, पहा
अहमदनगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर, गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीत वितरित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत. यामुळे आता लवकरच जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक लोकांना आनंदाचा शिधा देऊ केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेगाव आणि नगर तालुक्यातील काही गावात हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे.
मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यात अद्याप हा शिधा पोहोचलेला नाही. परंतु मार्च अखेरपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये शासनाच्या माध्यमातून हा आनंदाचा शिधा पोहोचवला जाणार असून याच प्रत्यक्ष वाटप एप्रिल महिन्यात होणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाला 14 एप्रिल पूर्वी म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी हा आनंदाचा शिधा जिल्ह्यातील जनतेला प्राप्त होणार आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अति-मुसळधार पावसाचा इशारा, कोसळणार अवकाळी !