अहमदनगरच्या चहावाल्याचा पोरगा बनला अधिकारी ! यूपीएससी परीक्षेत संगमनेरचा मंगेश चमकला, विपरीत परिस्थितीत मिळवल यश, वाचा….

Ajay Patil
Published:
Ahmednagar UPSC Success Story

Ahmednagar UPSC Success Story : यूपीएससी अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी तयारी करतात. देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून यूपीएससीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. या परीक्षेसाठी देशातील लाखो विद्यार्थी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात.

दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल अर्थातच 23 मे 2023 रोजी जारी झाला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आता याचा रिझल्ट डिक्लेअर झाला असून यात महाराष्ट्राच्या हजारो विद्यार्थ्यांनी यश संपादन करून दाखवले आहे. यात यशस्वी झालेल्या अनेकांनी विपरीत परिस्थितीमध्ये यशाला गवसणी घातली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या एका चहा वाल्याच्या मुलाने देखील आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही यूपीएससी परीक्षेत अभूतपूर्व अशी कामगिरी करत आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. एका चहावाल्याचा पोरगा पंतप्रधान बनतो, एक रिक्षा चालवणारा राज्याचा मुख्यमंत्री बनतो तर आता अहमदनगरचा चहावाल्याचा पोरगा यूपीएससी परीक्षेत यश मिळवत अधिकारी बनला आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार चार टक्के वाढ; ‘या’ महिन्याच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

संगमनेर तालुक्यातील मौजे सुकेवाडी येथील मंगेश खिलारी याने यूपीएससी परीक्षेत 396 वी रँक मिळवत अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. खरं पाहता मंगेश यांचे वडील चहाची टपरी चालवतात तर आई विडी कामगार म्हणून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत.

यामुळे मंगेश यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेलं हे इतरांपेक्षा अधिक चमकदार बनले आहे. मंगेश सांगतात की, वडिलांना यूपीएससीबद्दल थोडीफार माहिती आहे मात्र त्यांच्या आईला यूपीएससी परीक्षा संदर्भात काहीच ठाऊक नाही. परंतु आई-वडिलांनी केलेल्या काबाडकष्टांमुळे आज त्यांना हे यश मिळवता आले आहे.

यामुळे त्यांनी यूपीएससीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आणि रिझल्ट मध्ये त्यांचे नाव आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या वडिलांना फोन केला आणि याची माहिती दिली.ते सांगतात की त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या वडिलांना एकदाही मिठी मारली नाही मात्र आता गावी परतून आपल्या वडिलांना कडाडून मिठी मारण्याची त्यांची इच्छा आहे.

सुकेवाडीच्या मंगेशचे अधिकारी होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे. विशेष बाब म्हणजे मंगेश यांनी वयाच्या 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्याचा बहुमान पटकावला आहे. यामुळे त्यांचे हे यश विविध अंगाने खास बनले आहे.

हे पण वाचा :- बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत निघाली लिपिक पदाची मोठी भरती, पदवीधर तरुण राहणार पात्र, आजच करा अर्ज

शेतकरी पुत्र आहेत मंगेश

खरं पाहता मंगेश यांची गावाकडे शेती आहे. मात्र गावाकडील शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळत नाही यामुळे त्यांच्या वडिलांनी संसाराचा गाडा चालवण्यासाठी चहाची टपरी टाकली आहे आणि आई विडी कामगार म्हणून काम पाहतात. एकंदरीत त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे.

मात्र या हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्च शिक्षण दिले. मंगेशचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झेडपीच्या शाळेत झाले आहे, माध्यमिक शिक्षण त्यांनी संगमनेर येथे घेतले असून पदवीचे शिक्षण पुण्यात घेतले आहे. मंगेश यांनी आयआयटीत शिक्षण घ्यायच किंवा यूपीएससी मध्ये यश मिळवायचं असं स्वप्न उराशी बाळगलं होतं.

पैशाअभावी आयआयटीच स्वप्न पूर्ण झालं नाही मात्र मेहनतीच्या जोरावर त्यांनी यूपीएससीत यश मिळवून दाखवल आहे. या यशात त्यांना त्यांच्या मित्रांचे आणि शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले असून हे यश केवळ आई-वडिलांच्या कष्टांमुळेच मिळवता आले असेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे. दरम्यान अहमदनगरच्या या लेकाच्या कार्यावर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी मंगेशच्या या कार्याचे कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. एकंदरीत मंगेश यांनी खडतर परिस्थितीमध्ये प्राप्त केलेले हे यश कौतुकास्पद असून यामुळे देशात चहावाल्याचा पोरगा आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एवढे नक्की.

हे पण वाचा :- आता मतदान कार्ड काढण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही; केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, अमित शहा यांनी दिली माहिती, वाचा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe