Airtel Sim Activation Rule:- जर तुम्ही एअरटेल ग्राहक असाल किंवा नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल तर सिम एक्टिवेशन आणि किमान रिचार्ज नियम समजून घेणे आवश्यक आहे. पूर्वी कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनद्वारे सिम सक्रिय ठेवणे शक्य होते. परंतु नवीन नियमांनुसार किमान रिचार्ज रक्कम वाढवण्यात आली आहे.
एअरटेलचे नवीन नियम काय?
किमान रिचार्ज आवश्यकता – एअरटेलने सिम सक्रिय ठेवण्यासाठी किमान १२८ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे रिचार्ज करणे बंधनकारक केले आहे.
कमी किमतीचा प्रीपेड प्लॅन – सध्या एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन १९९ रुपयांचा आहे. त्यामुळे सिम सक्रिय ठेवण्यासाठी १९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो.
पूर्वीची रक्कम कमी – याआधी किमान रिचार्ज १५५ रुपये होता. पण आता तो १२८ रुपयांपर्यंत खाली आणला गेला आहे.
रिचार्ज केले नाही तर काय होईल ?
जर तुम्ही एअरटेल सिम रिचार्ज केले नाही तर तुमचा नंबर बंद होण्याचा धोका असतो. एअरटेलच्या नियमांनुसार खालील परिस्थितीत सिम बंद होऊ शकते…..जर तुम्ही कोणताही इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल केला नाही. एसएमएस पाठवले नाहीत. इंटरनेट डेटा वापरला नाही व तुमच्या खात्यात किमान २० रुपये शिल्लक नाहीत.या सर्व परिस्थितींमध्ये एअरटेल तुमचे सिम निष्क्रिय करू शकते.
सिम निष्क्रिय झाल्यानंतर काय होईल?
९० दिवस सतत निष्क्रिय राहिल्यास एअरटेल १५ दिवसांचा अतिरिक्त ग्रेस पीरियड देईल. या कालावधीत तुम्ही तुमचा नंबर पुन्हा सक्रिय करू शकता. पण तुमच्या खात्यात किमान २० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. जर या १५ दिवसांतही कोणताही रिचार्ज किंवा कॉल केला गेला नाही तर सिम कायमचे बंद होऊ शकते आणि नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाऊ शकतो.
तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी उपाय
दर ९० दिवसांनी किमान १२८ रुपयांचा रिचार्ज करा.जेणेकरून तुमचा नंबर सक्रिय राहील. नियमितपणे कोणता ना कोणता कॉल करा, एसएमएस पाठवा किंवा इंटरनेट डेटा वापरा. तुमच्या खात्यात किमान २० रुपये शिल्लक ठेवा.जेणेकरून सिम निष्क्रिय झाल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळू शकेल.एअरटेलने सिम सक्रिय ठेवण्यासाठी किमान रिचार्ज नियम कडक केले आहेत. जर तुम्हाला तुमचा नंबर कायमस्वरूपी बंद होऊ द्यायचा नसेल तर ९० दिवसांतून एकदा किमान १२८ रुपयाचा रिचार्ज करणे आवश्यक आहे. तसेच नियमितपणे कॉल, एसएमएस किंवा डेटा वापरणे फायद्याचे ठरेल.
तुम्ही या नियमांनुसार योग्य काळजी घेतली तर तुम्हाला तुमचा एअरटेल नंबर बंद किंवा डीऍक्टिव्ह होईल याची चिंता करण्याची गरज नाही.