लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची होणार छाननी! लावले जातील ‘हे’ 5 निकष; महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यातील बहुतांश अर्ज पात्र ठरले व अशा महिलांना लाभ देखील देण्यात आला.

Ajay Patil
Published:
majhi ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली व या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आणि पात्र महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यातील बहुतांश अर्ज पात्र ठरले व अशा महिलांना लाभ देखील देण्यात आला.

त्यानंतर महायुतीचे सरकार आता सत्तेत आहे व लाडकी बहीण योजनेच्या प्राप्त अर्जांच्या आता छाननी होणार आहे. या छाननीसाठी आता काही निकष लावण्यात येणार आहेत.

राज्य सरकारचे दोन जानेवारीला मंत्रिमंडळाची बैठक झाली व या बैठकीनंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी आता कशी केली जाणार आहे याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. याकरिता पाच निकष लावण्यात येणार आहेत व त्यानुसार आता अर्जांची छाननी होणार आहे.

हे पाच निकष लावून होणार लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची छाननी

1- अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना जाता या योजनेचा लाभ मिळणार आहे व याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून आयकर विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे व त्यानुसार अर्जांची छाननी होणार आहे.म्हणजेच अडीच लाख रुपयापेक्षा ज्यांचे उत्पन्न जास्त असेल अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

2- समजा एखादी लाभार्थी महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा प्राप्त अर्जाचा देखील आता पुनर्विचार केला जाणार आहे.

एखादा लाभार्थी जर नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल व त्याला जर या योजनेतून एक हजार रुपये आधीच मिळत असतील तर अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपये पर्यंतचा फरक भरला जाणार आहे.

3- चार चाकी वाहने असणाऱ्या महिलांच्या अर्जाची आता पडताळणी होणार असून त्याकरिता परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. जर अशा महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना यापुढे मात्र लाभ मिळणार नाही.

4- एखाद्या पात्र लाभार्थी महिलेचे जर आधार कार्ड वर नाव वेगळे आणि बँकेत जर नाव वेगळे असेल तर अशा अर्जांची सुद्धा आता पडताळणी होणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी जेव्हा मिळेल त्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे.

5- लग्नानंतर दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना जर कोणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा प्राप्त अर्जाची सुद्धा आता पडताळणी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe