आशियातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ गावात ! मुंबई आणि पुण्याला जोडणारा नवा मार्ग डिसेंबरमध्ये खुला होणार

Mumbai Pune Missing Link Project : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबई ते पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दरम्यान हिच वाहतूक कोंडी कमी व्हावी या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महामंडळाकडून या मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत खोपोली ते कुसगावदरम्यान एक नवीन मार्गिका विकसित केली जात आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. या प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात नवीन डिटेल समोर आल्या आहेत.

प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेली 19.80 किमी लांबीची ‘मिसिंग लिंक’ मार्गिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. खरे तर आधी हा प्रकल्प हा गोष्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे.

दरम्यान सध्याची स्थिती पाहता हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एमएसआरडीसीकडून हा प्रकल्प डिसेंबरमध्ये सेवेत आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती मिळवा रिपोर्ट मधून समोर आली आहे. म्हणजेच मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास डिसेंबर 2025 पासून वेगवान होणार आहे.

कसा आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट?

मिसिंग लिंक प्रोजेक्ट बाबत बोलायचं झालं तर खोपोली ते कुसगावदरम्यान उभारण्यात येणारी ही नवी मार्गिका दोन टप्प्यांत पूर्ण केली जात आहे. या मार्गिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात दोन बोगदे आणि खोल दऱ्यांमधून जाणारे पूल समाविष्ट आहेत. यातील एक बोगदा 1.75 किमी तर दुसरा 8.92 किमी लांबीचा आहे. विशेष म्हणजे 8.92 किमी लांबीचा बोगदा हा आशियातील सर्वात रुंद बोगदा असून त्याची रुंदी ही तब्बल 23.75 मीटर आहे.

लोणावळ्याजवळील तलावाखाली जवळपास 500 ते 600 फूट खोल हा बोगदा बांधण्यात आला आहे. हा बोगदा या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर सध्या या प्रकल्पाचे 93 टक्के काम पूर्ण झाले असून पूल बांधणीचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता डिसेंबरमध्ये ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल असा विश्वास संबंधितांकडून व्यक्त केला जातोय. असे झाल्यास मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार यात शंकाच नाही.