Automatic Car: 4 ते 6 लाख रुपयांत घरी न्या ‘या’ ऑटोमॅटिक कार! मिळेल 27 किमीचे मायलेज आणि बरच काही….

ऑटोमॅटिक कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही कितीही ट्रॅफिकमध्ये कार चालवली तरी ड्रायव्हिंग कंटाळवाणी न होता आरामदायी होते व ट्रॅफिक मध्ये देखील चांगली मायलेज देण्यास या कार सक्षम असतात.

Ajay Patil
Published:
automatic car

Automatic Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे कार मॉडेल्स उपलब्ध असून यामध्ये सात सीटर कार पासून सीएनजी कार तसेच इलेक्ट्रिक कार आणि ऑटोमॅटिक कारचा समावेश आपल्याला करता येईल. या सगळ्या प्रकारांमध्ये कार उत्पादक कंपन्यांनी अनेक प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून वैशिष्ट्यपूर्ण अशा कार उत्पादित केलेल्या आहेत.

त्यामुळे ग्राहकांना आता त्यांची गरज आणि आवडीनुसार कार मॉडेल निवडण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झालेले आहेत. या सगळ्या पर्यायांमध्ये जर आपण बघितले तर ग्राहकांच्या माध्यमातून आटोमॅटिक कार घेण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसून येत आहे.

ऑटोमॅटिक कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही कितीही ट्रॅफिकमध्ये कार चालवली तरी ड्रायव्हिंग कंटाळवाणी न होता आरामदायी होते व ट्रॅफिक मध्ये देखील चांगली मायलेज देण्यास या कार सक्षम असतात.

या दृष्टिकोनातून तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये कमीत कमी किमतीत चांगली वैशिष्ट्ये असणारी ऑटोमॅटिक कार घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण काही कमी किमतीतल्या महत्त्वाच्या ऑटोमॅटिक कारची माहिती घेऊ.

 या आहेत भारतातील कमी किमतीत मिळणाऱ्या ऑटोमॅटिक कार

1- मारुती वॅगनार( ऑटोमॅटिक)- ही कार मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज असून या कारमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन असून जे एएमटी गिअरबॉक्स वर 27 किमीचे मायलेज देते. मारुती सुझुकी वॅगनआरची किंमत पाच लाख 54 हजार रुपयांपासून सुरू होते.

तसेच स्पेस देखील चांगला असून पाच जण या कारमध्ये बसू शकतात. सुरक्षेकरिता या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सह इबिडीसह आणि एअरबॅग आहेत.

2- मारुती अल्टो K10( ऑटोमॅटिक)- ही भारतातील सर्वात स्वस्त आणि फायदेशीर अशी ऑटोमॅटिक कार असून या कारमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन असून ते एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही कार 25 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह EBD आणि एअरबॅग देण्यात आलेल्या असून या कारची किंमत तीन लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- मारुती स्विफ्ट( ऑटोमॅटिक)- मारुती सुझुकीच्या माध्यमातून नुकतीच नवीन स्विफ्ट बाजारपेठेत आणली गेली असून या नवीन कारमध्ये झेड सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे व ते 82 एचपी पावर आणि 112 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 27 किलोमीटरचे मायलेज देते. तसेच सुरक्षिततेकरिता या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि त्यासोबत ईबीडी आणि एअर बॅग देण्यात आलेल्या असून या कारची किंमत सहा लाख 49 हजार रुपये आहे.

4- मारुती सेलेरिओ मारुती सुझुकीची सेलेरिओ एक फॅमिली कार म्हणून ओळखली जाते. या कारमध्ये  1.0- लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्सशी कनेक्ट आहे. ही कार एएमटी व्हेरियंटला 26.68 किलोमीटर प्रति लिटरचे मजबूत मायलेज देते व या कारची किंमत पाच लाख 36 हजार रुपये आहे.

5- होंडा सिटी( ऑटोमॅटिक)- ही एक प्रीमियम सेडान कार असून तिची कामगिरी उत्कृष्ट अशी आहे. या कारमध्ये कंपनीने  1.5- लिटर i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पर्यायामध्ये उपलब्ध असून एका लिटरमध्ये ही कार 24.1 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe