सणासुदीमध्ये फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा लाभ घ्या आणि 1 लाखाच्या आत खरेदी करा ‘या’ बेस्ट बाईक! वाचा यादी

सणासुदीच्या कालावधीमध्ये शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या प्रकारची वाहने खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये बाईक तसेच कार मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात.विशेष म्हणजे या कालावधीमध्ये वाहन उत्पादक कंपनी आणि फ्लिपकार्ट व अमेझॉन सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अनेक सवलती दिल्या जातात.

Published on -

सणासुदीच्या कालावधीमध्ये शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या प्रकारची वाहने खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये बाईक तसेच कार मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात.विशेष म्हणजे या कालावधीमध्ये वाहन उत्पादक कंपनी आणि फ्लिपकार्ट व अमेझॉन सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील अनेक सवलती दिल्या जातात.

त्यामुळे ग्राहक या कालावधीमध्ये या सवलतींचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करतात. अगदी याच पद्धतीने या कालावधीत सध्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू असून यामध्ये विविध पेमेंट स्कीमवर ऑफर देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये बाईक खरेदी करायचे असेल तर तुम्हाला एक लाख रुपयांच्या आत असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या टॉप चार बाईकची माहिती घेऊ जी तुम्हाला फायद्याचे ठरेल.

 फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये एक लाखाच्या आत मिळतील या आकर्षक बाईक

1- हिरो एचएफ डीलक्स हिरो कंपनीची एचएफ डीलक्स ही एक खूप आकर्षक आणि ग्राहकांची पसंतीची बाईक असून या बाईकची किंमत 61 हजार 870 रुपये इतकी आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये या बाईकवर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.

ग्राहकाने जर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर flipkart 7500 पर्यंत बचत करणारी स्कीम ऑफर करत असून ई कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर आधारित तीन हजार 250 रुपये पर्यंतच्या पेमेंट ऑफर्स देखील मिळवू शकतात.

2- बजाज प्लेटिना 110 ड्रम बजाजची प्लॅटिना ही एक उत्तम मायलेज देणारी व परवडणारी बाईक म्हणून ओळखली जाते. फ्लिपकार्ट फेस्टिवल सेलमध्ये या बाईकवर दहा हजार रुपयापर्यंत ची सूट मिळत असून त्यामध्ये 3468 रुपये पर्यंतचे क्रेडिट डिल सह दोन हजार रुपयांचे कुपन सूट म्हणून देण्यात येत आहे.

जर 7,000 पेक्षा जास्तीचा खर्च ग्राहकाने केला तर त्याला पाच हजार रुपयांची बचत करण्याची  संधी मिळणार आहे. या बाईकची किंमत ७१,३५४ रुपये असून फ्लिपकार्ट वर ती 61 हजार 354 रुपयांना मिळत आहे.

3- हिरो स्प्लेंडर+ Non i3S ड्रम हिरोची स्प्लेंडर ही संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आणि सर्वाधिक विक्री होणारी बाईक असून फ्लिपकार्टच्या माध्यमातून आठ हजार रुपये पेक्षा जास्त सूट या बाईकवर मिळत आहे.या बाईकची किंमत 75 हजार 441 रुपये असून फ्लिपकार्टची किंमत 67 हजार 999 रुपये आहे.

यामध्ये ग्राहकाने जर 7000 रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर ग्राहकाला या माध्यमातून पाच हजार तीनशे सात रुपये वाचवता येणार आहेत. तसेच क्रेडिट कार्डवर तीन हजार रुपये पर्यंत आणि डेबिट कार्डवर 3250 रुपयापर्यंत सूट मिळते.

4- बजाज पल्सर 125- बजाजच्या पल्सर लाईनअप मधील ही एक मोटरसायकल परवडणारी म्हणून ओळखली जाते. फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये या बाईकवर बारा हजार रुपयांची सूट मिळत आहे. बजाज पल्सर 125 ची किंमत 92883 रुपये असून फ्लिपकार्टच्या माध्यमातून ती 76 हजार 39 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

यामध्ये दोन हजार रुपयांची कुपन डीलचा समावेश असून 6250 रुपयांपर्यंत क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर डील उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाने जर 12,000 रुपयांचा अधिक खर्च केला तर त्यावर 8844 रुपयांची बचत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News