पाणी पिताना ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या त्यामागचे कारणे

Ahmednagarlive24 office
Published:

पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. मात्र पाणी पिण्याचेही काही नियम आहेत ज्यांचे पालन केल्यास चांगले स्वस्थ राहण्यास मदत होते.

इतर पोषक घटकांप्रमाणेच, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण पाणी पिताना काही नियम पाळले पाहिजेत.

आपण दररोज पाणी पिताना काही चुका करतो. सर्वजण आपल्याला उभे राहण्याऐवजी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे उभे राहून पाणी पिल्याने नसांमध्ये ताण निर्माण होतो, शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि अपचन होऊ शकते.

आयुर्वेदातही उभे राहून पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे. उभे राहून पाणी प्यायल्यास शरीराचा लिक्विड बॅलन्स बिघडतो. यामुळे शरीराच्या सांध्यांना पाणी मिळत नाही.

यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या सतावतात. आयुर्वेदानुसार आपले पोट 50 टक्के अन्न आणि 25 टक्के पाण्याने भरले पाहिजे. उर्वरित 25 टक्के पचनासाठी रिकामे ठेवावे. त्यामुळे जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यास शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

उभे राहून पाणी पिणे किडनीसाठी हानिकारक मानले जाते. यामुळे किडनीचा त्रास संभवतो. उभे राहून पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. उभे राहून पाणी प्यायल्यास अन्न पचण्यास अडथळा येतो.

यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते ज्यामुळे हृदयविकारासारख्या समस्या येऊ शकतात. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर तुम्हाला अल्सरची समस्या सतावू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या निर्माण होते. खाल्लेले अन्न नीट पचत नाही. यामुळे अपचानाचा त्रास होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe