बाबा वेंगाची 2025 साठीची सर्वात मोठी भविष्यवाणी ! ‘या’ असाध्य रोगावर औषध सापडणार, तिसऱ्या महायुद्धाची पण शक्यता

बाबा वेंगा आणि त्यांची भविष्यवाणी नेहमीचं चर्चेत राहते. त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी असंख्य भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. दरम्यान, आज आपण 2025 साठी बाबा वेंगा यांनी कोणत्या महत्त्वाच्या भविष्यवाणी केलेल्या आहेत याची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Baba Venga Prediction : बुल्गेरियातील दृष्टिहीन बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध भविष्यवेत्ती होती. तिचा जन्म 1911 मध्ये झाला आणि तिने हयात असताना अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः अंध असताना सुद्धा त्यांनी केलेल्या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला जातो.

बाबा वेंगा यांनी जिवंत असताना अशा अनेक भविष्यवाणी केल्या आहेत, त्यापैकी बहुतेक खऱ्या ठरल्यात असे म्हटले जाते. त्याच्या भविष्यवाणींमध्ये 9/11 चा दहशतवादी हल्ला, जपानमधील त्सुनामी, सोव्हिएत युनियनच विघटन, चेरनोबिल अपघात आणि बराक ओबामा अध्यक्ष होणे यांचा समावेश होतो.

या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी की, 2025 या वर्षासाठी सुद्धा बाबा वेंगाने काही मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. दरम्यान आज आपण 2025 साठी बाबा वेंगा यांनी केलेल्या दोन मोठ्या भविष्यवाण्यांची माहिती पाहणार आहोत.

असाध्य आजाराचे औषध सापडणार

बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये एका असाध्य आजारावर औषध सापडणार अशी भविष्यवाणी केलेली आहे. वेंगा यांनी कॅन्सर म्हणजेच कर्करोगावर 2025 मध्ये औषध सापडणार अशी भविष्यवाणी केली असून ही भविष्यवाणी सत्यात उतरली तर नक्कीच अनेक लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

वेंगा यांनी कॅन्सरच्या विरोधात वैज्ञानिकांना मोठे यश मिळणार असे म्हटलेले आहे. नक्कीच कॅन्सरवर जर औषध सापडले तर कर्करोगामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये तिसरे महायुद्ध होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिसऱ्या महायुद्धाचा सर्वाधिक फटका युरोपियन राष्ट्रांना बसणार आहे. खरे तर तिसऱ्या महायुद्धाचे संकेतही आपल्याला मिळू लागले आहेत.

एकीकडे रशिया आणि युक्रेन मध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे आणि दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे इजराइलने गाजा पट्टी मधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवलेला आहे.

भारताने सुद्धा पाकिस्तानातील दहशतवादी तळ उडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या संपन्न झालेले आहे.

एवढेच नाही तर बाबा वेंगा यांनी अमेरिकेच्या पश्चिमीकडे 2025 मध्ये मोठ्या भूकंपाचे धक्के बसू शकतात अशी ही भविष्यवाणी केलेली आहे. यामुळे आता या भविष्यवाण्यापैकी कोणती भविष्यवाणी खरी ठरणार? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe