Banana rate : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती होऊ लागली आहे. यामध्ये केळी पिकाची देखील लागवड आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड अधिक आहे. दरम्यान आता केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरं पाहता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केळीच्या दरात लवकरच वाढ होणार असल्याचे अशा व्यक्त केली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात केळीच्या दरात 200 ते 700 रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सद्यस्थितीत बाजारात केळीला 1800 रुपये पर्यंतचा दर मिळत आहे.
म्हणजेच पुढील महिन्यात केळीला 2200 ते 2500 रुपये पर्यंतचा दर मिळण्याची आशा जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे. निश्चितच यामुळे केळी उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. जाणकार लोकांच्या मते, आखाती देशातून केळीची मागणी वाढत असल्याने याचा फायदा केळी उत्पादकांना होणार आहे. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात होईल आणि दरात मोठी वाढ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
प्रमुख केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात केळीची परदेशात निर्यात होत आहे. दरम्यान यावर्षी जिल्ह्यातून विदेशात जास्त प्रमाणात केळीची निर्यात होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. यामुळे केळीला समाधानकारक दर मिळेल अशी आशा आहे.
खरं पाहता 2021 मध्ये केळीची जळगाव जिल्ह्यातून 400 कंटेनर एवढी निर्यात झाली होती. दरम्यान यावर्षी हा आकडा वाढणार असून तेराशे ते चौदाशे कंटेनर केळीची निर्यात होण्याची शक्यता आहे. निश्चितच यामुळे सरळ केळी उत्पादकांना बेनिफिट मिळणार आहे. निर्यात वाढणार असल्याने दरात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे यामुळे यावर्षी केळी उत्पादक मालामाल होणार असल्याचे चित्र आहे.