Bank Of Baroda कडून 42 लाखांच्या होम लोनसाठी तुमचा मासिक पगार किती हवा ?

नजीकच्या भविष्यात तुम्हीही Home Loan घेणार आहात का ? मग तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. बँक ऑफ बडोदा कमीत कमी व्याजदरात आपल्या ग्राहकांना गृह कर्ज देत आहे.

Published on -

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, यामुळे स्वप्नातील घरांच्या खरेदीसाठी अनेकजण होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत. तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख बँकांकडून होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा अशा अनेक बँकांनी आपल्या विविध कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत. कारण की, आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयकडून गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक वर्षानंतर रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. दरम्यान, या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाही आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आणि याचाच परिणाम म्हणून आता बँकांनी आपले होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत.

त्यामुळे जर तुम्हालाही होम लोन घ्यायचे असेल तर सध्याचा काळ हा गृह कर्जासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. अशा परिस्थितीत, आता आपण बँक ऑफ बडोदाच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदाचे व्याजदर 

जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.

सध्या स्थितीला बँकेकडून आपल्या ग्राहकांना किमान 7.45% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात असून हा बँकेचा अगदीच सुरुवातीचा व्याजदर आहे. म्हणजे या व्याजदराचा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर साडेसातशे पेक्षा जास्त आहे त्यांनाच फायदा मिळू शकतो. 

42 लाखांच्या होम लोनसाठी मासिक पगार किती हवा? 

खरे तर, तुम्हाला किती होम लोन मंजूर होणार आहे हे सगळं तुमचे वय, EMI, व्याजदर, कर्जाचा कालावधी अशाच वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. होम लोन मंजूर करताना व्यक्तीचा सिबिल स्कोर सुद्धा तपासला जातो. यासोबतच व्यक्तीचे मासिक उत्पन्न देखील पाहिले जाते.

होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचे उत्पन्न स्थिर आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते. दरम्यान, 67,500 मासिक पगार असणाऱ्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदा कडून 42 लाख रुपयांचे होम लोन मंजूर होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. 

42 लाखांच्या होम लोन साठी कितीचा हप्ता?

समजा तुम्हाला बँकेकडून 42 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी बँकेच्या किमान व्याजदरात म्हणजेच 7.45% दराने मंजूर झाले तर तुम्हाला 33 हजार 750 रुपयांचा मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागणार आहे. मात्र, बँकेच्या किमान व्याजदराचा लाभ चांगला सिबिल स्कोर असेल तेव्हाच मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!