पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
Banking Jobs

Banking Job In Maharashtra : पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे पदवीधर उमेदवार बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करत असतील अशा उमेदवारांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे. कारण की देशातील अग्रगण्य बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ बरोडा या सरकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

त्यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली आहे. सदर अधिसूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बँकेच्या माध्यमातून विविध पदांच्या तब्बल 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

कोणत्या पदासाठी होणार आहे भरती?

झोनल सेल्स मॅनेजर या पदाच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रीजनल सेल्स मॅनेजर या पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत.

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट या पदाच्या तब्बल 50 जागा भरल्या जाणार आहेत.

सिनियर मॅनेजर या पदाच्या तब्बल 110 जागा भरल्या जाणार आहेत.

मॅनेजर या पदाच्या 40 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वर नमूद करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. तसेच संबंधित पदावर काम केल्याचा अनुभव देखील सदर उमेदवाराला असणे आवश्यक आहे. पदानुसार दोन वर्षे ते बारा वर्षे पर्यंतचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. यामुळे शैक्षणिक अहर्तेबाबत तसेच अनुभवाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघणे अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

आवश्यक वयोमर्यादा?

22 वर्षे ते 48 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे.

अर्ज कसा करायचा

सदर पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवाराला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 11 मे 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सादर करू शकणार आहे. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe