Banking Jobs : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. बँकिंग एक्झाम साठी अहोरात्र अभ्यास करतात. जर तुम्ही किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची उराशी इच्छा बाळगून असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे.
कारण कि देशातील एका प्रमुख बँकेत मोठी पद भरती आयोजित झाली आहे. त्यासाठीची अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. आयडीबीआय बँकेने रिक्त पदाच्या पदभरतीसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित केली आहे.
या अधिसूचनेनुसार बँकेत एक्झिक्युटिव्ह पदाच्या 1000 हुन अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण आयडीबीआय बँकेतील या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, अर्ज कसा करावा लागणार, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, अधिसूचना कुठे पाहता येणार? यांसारखी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती?
या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेत एक्झिक्यूटिव्ह या पदाच्या 1 हजार 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
आयडीबीआय बँकेने काढलेल्या अधिसूचनेनुसार यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. तरीही अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक राहणार आहे.
आवश्यक वयोमर्यादा?
यासाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार तीन वर्षे ते पाच वर्षापर्यंतची वयोमर्यादेत सूट राहणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही आयडीबीआय बँकेच्या शाखेत नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून कालपासून अर्थात 24 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
अर्ज फि
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक हजार रुपये फी लागणार आहे. पण मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना मात्र 200 रुपये फी आकारली जाणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
या पदासाठी 7 जून 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. सात जून नंतर मात्र अर्ज भरता येणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
भरतीची जाहिरात कुठे पाहता येणार?
https://drive.google.com/file/d/1om1JRKeID8kh7DRiN4l3w1f6C4dK1GFK/view?usp=share_link लिंक वर जाऊन इच्छुक व्यक्तींना या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…