बँक ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार, कारण काय ?

Published on -

Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून देशातील सर्वच सरकारी आणि खाजगी बँका सलग चार दिवसांसाठी बंद ठेवल्या जाणार असल्याची एक धक्कादायक माहीती समोर आली आहे. यामुळे जर तुमचेही बँकेत काही काम असेल तर तुम्हाला ही सर्व कामे २७ तारखेनंतरच करता येणार आहेत.

दरम्यान उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने यामुळे देशातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जाणार आहेत. 

बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा 

बँक कर्मचारी मंगळवारी संप पुकारणार आहेत. पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संपात सार्वजनिक, खासगी, परदेशी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती बँक कर्मचारी संघटनांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, हा संप अशा काळात होत आहे की नागरिकांना सलग चार दिवस बँक बंद राहण्याचा सामना करावा लागू शकतो. २४ जानेवारी रोजी चौथा शनिवार असल्याने बँका बंद, २५ जानेवारीला रविवार, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि २७ जानेवारीला देशव्यापी संप असल्यामुळे बँकिंग सेवा पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे रोख व्यवहार, धनादेश जमा करणे, पैसे काढणे, कर्जविषयक कामे, ठेवी आणि इतर महत्त्वाची बँकिंग कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे की पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याचा प्रस्ताव इंडियन बँक्स असोसिएशनने दोन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारकडे पाठवला होता, मात्र त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

ही मागणी ७ डिसेंबर २०२३ रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात झालेल्या कराराचा भाग होती. तसेच ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या संयुक्त नोट आणि समझोत्यातही या मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. प्रस्तावानुसार, सोमवार ते शुक्रवार कामाचा वेळ दररोज ४० मिनिटांनी वाढवून सर्व शनिवार सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मात्र कराराची अंमलबजावणी न झाल्याने संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हा संप युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली होणार असून, नऊ प्रमुख बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटना यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe