Banking News : तुम्हालाही बँकेत जाऊन बँकेशी निगडित कामे करायची आहेत का ? मग आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण आजपासून सुरू होणाऱ्या या तिसऱ्या आठवड्यात तसेच जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार याचा आढावा घेणार आहोत.
खरंतर आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात किती दिवस बँका बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चेक बँकेत जमा करणे, पासबूक अपडेट करणं याशिवाय प्रत्यक्षात बँकेत जाऊन इतर कामं पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणं महत्त्वाचं असतं.

पण बँकेत गेल्यानंतर आपली कामं लगेचच पूर्ण होण्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे माहिती असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. वास्तविक, आरबीआयकडून म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सुट्ट्यांची यादी जाहीर केली जात असते.
आरबीआयने आपल्या संकेतस्थळावर जून महिन्याचा सुट्ट्यांची यादी सुद्धा अपलोड केली आहे. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जुनच्या दुसऱ्या पंधरवड्यात भारतात बँका किती दिवसाठी बंद राहतील याबाबत माहिती समोर आली आहे.
जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँका किती दिवस बंद राहणार ?
या चालू आठवड्यात म्हणजेच 15 जून ते 22 जून दरम्यान बँक फक्त दोन दिवस बंद राहणार आहेत. 15 जून रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे आणि पुढे 22 जून रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र बँकांना सलग चार दिवस सुट्ट्या राहणार आहेत. आता आपण देशातील बँका जून महिन्याचा दुसऱ्या पंधरवड्यात कोणकोणत्या दिवशी बंद राहतील याचीमाहिती पाहूयात.
15 जून : रविवार असल्याने संपूर्ण देशभरातील बँकांना सुट्ट्या राहणार आहेत.
22 जून : या दिवशी सुद्धा रविवार असल्यानं महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
27 जून : या दिवशी ओडिशा आणि मणिपूर राज्यात रथ यात्रा किंवा कांग निमित्त बँका बंद राहणार आहेत.
28 जून : 28 जून रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
29 जून : रविवार निमित्ताने संपूर्ण देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
30 जून : या दिवशी मिझोरममध्ये रेमनानिमित्त बँकांना सुट्टी राहणार असल्याची माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.