Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांवर मोठी कठोर कारवाई केलेली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक बँकांचे लायसन्स रद्द झाले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये देखील आरबीआय ने देशातील अनेक बँकांवर कारवाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात देशाच्या मध्यवर्ती बँकेने तब्बल 35 बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. यामध्ये अनेक सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांचा समावेश होता.

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच एचडीएफसी बँकेचा सुद्धा या यादीत समावेश आहे. दरम्यान आता आपण मार्च महिन्यात देशातील कोणकोणत्या बँकांवर आरबीआयच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील किती बँकांचा समावेश होता? याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
देशातील या 35 बँकांवर कठोर कारवाई
खरे तर फेब्रुवारी 2025 मध्ये आरबीआयकडून देशातील 20 महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर मार्च महिन्यात 35 बँकांवर दंडात्मक कारवाई झाली. म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या काळात 50 हून अधिक बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता आपण मार्च महिन्यात कोणकोणत्या बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे याची यादी पाहूयात.
महाराष्ट्रातील द जालना पीपुल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मुंबई)
जनता सहकारी बँक लिमिटेड, गोंदिया, महाराष्ट्र
सहकारी अर्बन बँक लिमिटेड (पार्लकमुंडी, ओडिशा)
आयडीबीआय बँक
सिटी बँक
श्रीनिवास पद्मावती सहकारी अर्बन बँक लिमिटेड, तेलंगणा
सिंध सहकारी अर्बन बँक लिमिटेड, तेलंगाना
कर्नाटक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इश्यू, कर्नाटक
करीमनागर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, तेलंगाना
कडाकुरी सहकारी टाउन बँक लिमिटेड, तामिळनाडू
अनंतनाग सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जम्मू आणि काश्मीर
जोगेंद्र केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड, हिमाचल प्रदेश
बारामुल्ला सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जम्मू आणि काश्मीर
गुरदासपूर सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पंजाब
श्री बशेश्वर सहकार बँक रुजा गुलबर्ग कर्नाटक
एपी राजेश्वरी महिला सहकारी अर्बन बँक लिमिटेड, हैदराबाद
मगध सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बिहार
कर्नाटक ग्रामीण बँक (कर्नाटक)
दक्षिण कॅनारा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड (कर्नाटक)
म्हैसूर आणि चामराजनगर जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड (कर्नाटक)
टुमकूर विराशावा सहकारी बँक लिमिटेड (कर्नाटक)
श्री गणेश सहकारी बँक लिमिटेड (कर्नाटक)
आणि बागलकोट जिल्हा सहकारी बँक (कर्नाटक)
केरळची कोडुगल्लर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
केरळ मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (कोझिकोड)
गुजरातची पोरबंदर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
द संतराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (महीसागर, गुजरात)
निजामाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ऑफ तेलंगणा
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
आरबीआयच्या या दंडात्मक कारवाईमुळे या संबंधित बँकेच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम पाहायला मिळणार नाही. आरबीआय ने केलेली ही कारवाई बँकेवर असून बँकेच्या खातेधारकांवर नाही. म्हणजेच आरबीआय ही बँकेकडून दंडाची रक्कम वसूल करणार आहे. तसेच या कारवाईमुळे बँक आणि ग्राहक यांच्यामधील व्यवहार सुद्धा बाधित होणार नाही येत.