12वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! भाभा अनुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या 4 हजार 374 जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत पाठवा अर्ज, वाचा सविस्तर

BARC Recruitment : बारावी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतील अशा तरुणांसाठी ही बातमी खास आहे. कारण की, भाभा अनुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेनुसार, स्टायपेंडरी ट्रेनी, विविध विभागांमध्ये टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टेंट (फूड टेक्नोलॉजी / होम सायन्स / न्यूट्रीशन) आणि टेक्निशियन (बॉयलर अटेंडेंट) या पदाच्या एकूण 4373 जागावर भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

कोणत्या पदासाठी होणार भरती

स्टायपेंडरी ट्रेनी, विविध विभागांमध्ये टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टेंट (फूड टेक्नोलॉजी / होम सायन्स / न्यूट्रीशन) आणि टेक्निशियन (बॉयलर अटेंडेंट) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

स्टायपेंडरी ट्रेनी या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. सदर उमेदवाराने बारावीत 60% पेक्षा अधिक गुण मिळवले असणे अनिवार्य आहे. तसेच इतर पदासाठी संबंधित ट्रेड मधील सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा काळजीपूर्वक अधिसूचना वाचणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- युवा शेतकऱ्याचा वांग्याच्या शेतीतला हटके प्रयोग; ‘या’ जातीच्या वांगी लागवडीतून मिळवले एकरी आठ लाखांचे उत्पन्न, पहा….

अर्ज कसा करावा लागेल

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी उमेदवार barc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करू शकणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

या पदासाठी 24 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 22 मे 2019 पर्यंत उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.

भरतीची जाहिरात कुठं पाहणार?

उमेदवार https://barc.gov.in/hindi/recruitment/vacancy8.pdf या लिंकवर भरतीची जाहिरात पाहू शकणार आहेत.

हे पण वाचा :- अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !