महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदानासाठी अद्याप प्रतीक्षा असून सरकारच्या माध्यमातून तारीख पे तारीख देण्याचा खेळ अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या तारखा दिल्या गेल्या असून अद्याप पर्यंत मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान कधी येईल याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. परंतु आता हे अनुदान सोमवार म्हणजेच आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून सोमवारी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपये दिले जातील असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील 65 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा दावा देखील कृषिमंत्री यांनी केलेला आहे.

आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेले खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. परंतु हे अनुदान आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून आज कापूस व सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपये दिले जातील असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून रविवारी 2020, 2021 आणि 2022 या वर्षातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले व कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते व त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर व कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व या कार्यक्रमा प्रसंगी धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील या शेतकऱ्यांना केले जाईल अनुदान मंजूर
यावेळी माहिती देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की राज्यातील सुमारे 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असून त्यापैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले आहे व या आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान मंजूर केले जाणार आहे.
हे अनुदान प्रति हेक्टर 5000 असे दोन हेक्टर च्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतके मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटींचे वितरण सोमवारी म्हणजेच आज केले जाणार असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी दिली.