BMW Electric Scooter: बीएमडब्ल्यू भारतामध्ये आणत आहे धमाकेदार आणि जबरदस्त दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या किंमत

Ajay Patil
Published:
bmw ce 04 electric scooter

BMW Electric Scooter:- भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये अनेक कंपन्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये आणले असून

यामध्ये आता बीएमडब्ल्यू ही कंपनी त्यांची पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 04 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत असून ही स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये खास वैशिष्ट्यांसह दाखल केली जाणार आहे.

BMW भारतामध्ये आणत आहे पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

बीएमडब्ल्यू ही कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 04 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणारा असून यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.9 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे व या पॅकमुळे ही स्कूटर एका चार्जिंग मध्ये 130 किलोमीटर अंतर कापू शकते असा कंपनीने दावा केलेला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर साधारणपणे 31 kW टॉर्क जनरेट करते व त्यामुळे ही स्कूटर 2.6 सेकंदामध्ये शून्य ते 50 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते. या स्कूटरचा टॉप स्पीड पाहिला तर तो 20 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राईड मोड देण्यात आले असून त्यासोबतच ट्रॅक्शन कंट्रोल आणि एबीएसचे वैशिष्ट्य देखील असणार आहे. तसेच नेव्हिगेशन करिता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत व या सोबतच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टीएफटी डिस्प्ले देखील उपलब्ध असणार आहे.

 किती असणार या स्कूटरची किंमत?

बीएमडब्ल्यूने जेव्हा C 400 GT बाजारामध्ये लॉन्च केली होती तेव्हा तिची एक्स शोरूम किंमत 11.20 लाख रुपये इतकी होती व आता बीएमडब्ल्यू CE 04 या स्कूटरची किंमत त्यापेक्षा दुप्पट असेल अशी शक्यता आहे. तसेच बीएमडब्ल्यूची ही इलेक्ट्रिक स्कूटर 24 जुलै रोजी लॉन्च होईल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe