मकर संक्रांतीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज ! ‘या’ तारखेला मिळणार नमो शेतकरीचा आठवा हप्ता

Published on -

Breaking News : नमो शेतकरी योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. नमो शेतकरी योजना देखील अशीच एक राज्य पुरस्कृत योजना आहे.

शिंदे सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू झाली. नमो शेतकरी योजना पीएम किसान च्या धरतीवर सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान प्रमाणेच वार्षिक 6000 रुपयांचा लाभ मिळतो.

दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण सरकारकडून केले जाते. दरम्यान आता नमोच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सात हप्ते देण्यात आले आहेत आणि आता आठव्या हप्त्याची संभाव्य तारीख सुद्धा समोर आली आहे.

हफ्त्याची तारीख जाहीर 

Pm Kisan चा 21 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्त्याचे वितरण झाले. आता पीएम किसान च्या धरतीवर सुरू झालेल्या नमो शेतकरी चा पुढील आठवा हप्ता सुद्धा राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हा हफ्ता पुढील महिन्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पी एम किसान चा हप्ता जमा झाला की साधारणतः 15 20 दिवसात नमूचा हप्ता जमा होणे अपेक्षित असते. पण यावेळी नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान चा हप्ता जमा झाल्यानंतर आता थेट पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात नमोचा हप्ता जमा होणार आहे.

राज्यातील 91 लाख 97 हजार पात्र शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 1930 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच 5 फेब्रुवारी पर्यंत हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता आहे.

5 फेब्रुवारीला राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमोचा पुढील हप्ता वितरित करू शकते. अद्याप सरकारने हप्ता वितरणाची तारीख जाहीर केलेली नाही मात्र निवडणुका लक्षात घेता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या निधीचे वितरण केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe