Best Car Loan : गणेश चतुर्थीला खरेदी करा नवी कार ! बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज

Best Car Loan :- 2024 या वर्षाचा ऑगस्ट महिना सुरू असून साधारणपणे गणेश चतुर्थी पासून देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारतीय परंपरेतील सर्वात महत्त्वाचे सण लागोपाठ येतात व या सणासुदीच्या निमित्ताने अनेक जण नवनवीन वाहने खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असतात.

तसेच या कालावधीमध्ये अनेक फायनान्स कंपन्या देखील नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात व कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या ऑफर्स या कालावधीत दिल्या जातात.

या सणासुदीच्या कालावधीमध्ये तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  तुम्हाला देखील कमीत कमी व्याजावर कार लोन मिळू शकते.

जर आपण Paisabazaar.com कडून मिळालेली माहितीनुसार बघितले तर पाच वर्षाच्या कालावधीसह पाच लाख रुपयांच्या नवीन कार कर्जावरील 15 बँकांचे व्याजदर हे 8.45% ते 9 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. यामुळे या लेखात आपण कोणत्या बँकेचे व्याजदर किती आहेत व कार लोनसाठी कोणत्या बँकेकडून कर्ज घेणे परवडेल? इत्यादीची माहिती या लेखात बघणार आहोत.

 या बँकांचा व्याजदर सुरू होतो 8.45% पासून

1- युको बँक तुम्हाला जर कार लोन घ्यायचे असेल तर युको बँकेत पाच वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांच्या कार लोनवर आकारला जाणारा व्याजदर हा 8.45 टक्क्यांपासून सुरू होतो. यानुसार पाच लाख रुपयांच्या कर्जावर तुम्हाला दहा हजार दोनशे शेचाळीस रुपये ईएमआय भरावा लागतो.

2- युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेकडून जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर या बँकांच्या माध्यमातून 8.7 टक्के व्याजदर सुरू होतो व तुम्हाला महिन्याला दहा हजार तीनशे सात रुपये इतका ईएमआय भरावा लागतो.

3- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर 8.75 टक्क्यांपासून व्याजदर सुरू होतो व ईएमआय दहा हजार तीनशे एकोणवीस रुपये भरावा लागतो.

4- आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पाच लाख रुपयांचे कार लोन पाच वर्षाच्या कालावधीसाठी घेतले तर तुम्हाला या बँकेकडून 8.8% दराने व्याज आकारले जाते व महिन्याला तुम्हाला दहा हजार तीनशे एकतीस रुपये ईएमआय भरावा लागतो.

5- बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या माध्यमातून तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर व्याजदर 8.85% पासून सुरु होतो व ईएमआय दहा हजार तीनशे त्रेचाळीस रुपयांपासून सुरू होतो.

तसेच अनेक खाजगी बँक देखील आकर्षक व्याजदरावर कार लोन देत असून वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर वेगवेगळ्या असतात.