Budget Car: दिवाळीमध्ये कार घ्यायचा प्लॅन आहे का? ‘या’ आहेत 5 लाख रुपयापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या स्वस्त कार! वाचा यादी

भारतामध्ये प्रामुख्याने गणेश चतुर्थी पासून सणांचा कालावधी सुरू होतो व एका मागून एक असे भारतातील महत्त्वाचे सण येतात. यामध्ये घटस्थापना म्हणजेच नवरात्रीच्या कालावधी आणि त्यानंतर दसरा व दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत व या सणाच्या कालावधीमध्ये वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Published on -

Budget Car:- भारतामध्ये प्रामुख्याने गणेश चतुर्थी पासून सणांचा कालावधी सुरू होतो व एका मागून एक असे भारतातील महत्त्वाचे सण येतात. यामध्ये घटस्थापना म्हणजेच नवरात्रीच्या कालावधी आणि त्यानंतर दसरा व दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत व या सणाच्या कालावधीमध्ये वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

या कालावधीमध्ये कार घेण्याची प्लॅनिंग अनेक जणांची असते व या प्लॅनिंगमध्ये प्रामुख्याने कमीत कमी किमतीत चांगलीत चांगली कार आपल्याला मिळेल या पद्धतीने कारची निवड केली जाते.

सध्या भारतीय कार बाजार पेठेमध्ये अनेक प्रकारच्या कार उपलब्ध असून अनेक कार तुम्हाला स्वस्तात मिळतात व चांगले मायलेज व इतर चांगले फीचर्स देखील देतात. त्यामुळे तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये स्वस्तात मस्त म्हणजेच दमदार वैशिष्ट्य असलेली कार घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण काही महत्त्वाच्या स्वस्तातल्या कारची माहिती थोडक्यात घेऊ.

 सणासुदीच्या कालावधीत घ्या या स्वस्तातल्या कार

1- रेनॉल्ट क्विड ही एक भारतामध्ये लोकप्रिय असलेली कार असून या कार मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल इंजिन मिळते. जे 68 पीएस पावर आणि 91 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करते.

तसेच या कारचे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा पाच स्पीड एएमटीसह जोडलेले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत चार लाख 70 हजार रुपये आहे. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.

2- मारुती सुझुकी एसप्रेसो मारुती सुझुकीच्या लोकप्रिय कार पैकी ही एक कार खूप लोकप्रिय असून या कारमध्ये कंपनीने एक लिटर पेट्रोल इंजिन दिले असून जे 67 पीएस पावर आणि 89 एनएम पीक टॉक जनरेट करण्यासाठी सक्षम असून या कारचे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल किंवा पाच स्पीड एएमटी सह जोडलेले आहे. या कारची भारतातील एक्स शोरूम किंमत 4 लाख 26 हजार रुपये इतकी आहे.

3- मारुती सुझुकी सेलेरिओ भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या लोकप्रिय कार पैकी सेलेरिओ ही कार देखील तितकीच प्रसिद्ध असून या कारमध्ये 1.0- लिटर पेट्रोल इंजिन असून जे 67 पीएस पावर आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते व या कारचे इंजिन पाच स्पीड एएमटी किंवा पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची भारतातील एक्स शोरूम किंमत चार लाख 99 हजार रुपये आहे.

4- मारुती सुझुकी अल्टो के 10- मारुती सुझुकीची ही एक लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी कार असून या कार मध्ये कंपनीने एक लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिले असून हे 67 पीएस पावर आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारचे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल किंवा पाच स्पीड एएमटी गिअर बॉक्ससह जोडलेले आहे. या कारची भारतातील एक्स शोरूम किंमत चार लाख 96 हजार रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News