Business Success Story:- एखाद्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात करून तोच व्यवसाय उच्चांकी पातळीवर नेणे हे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. यासाठी अखंड मेहनत, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये आवश्यक सातत्य, काळानुसार व्यवसायात करावे लागणारे आवश्यक बदल व त्या दृष्टीने उचललेली पावले कायम बाजारपेठेचा अभ्यास करून त्यासंबंधीची व्यवसायातील प्लॅनिंग इत्यादी अनेक गुण खूप महत्त्वाचे असतात.
या सगळ्या पातळींवर जे व्यक्ती व्यवसाय वाढीसाठी काम करतात ते नक्कीच व्यवसाय छोट्या पासून अगदी मोठ्या स्तरापर्यंत विस्तारतात. भारतामध्ये असे अनेक उद्योगपती आज आपण पाहतो. परंतु कोणत्याही उद्योगपतीची यशोगाथा पाहिली तर ती अगदी छोट्या व्यवसायापासून सुरू झाली असून प्रचंड मेहनतीने ते आज इथपर्यंत पोहोचले आहेत.
याच मुद्द्याला धरून जर आपण फॅशन डिझायनर क्षेत्रातील अनिता डोंगरा यांची कहाणी पाहिली तर शिलाई मशीन घेऊन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या नीता डोंगरा या आज देशातील सर्वात श्रीमंत फॅशन डिझायनर म्हणून ओळखल्या जातात. इथपर्यंत पोहोचणे म्हणजे खूप सोपी गोष्ट नाही. यामागे अनिता यांचा खूप मोठा संघर्षाचा प्रवास आहे याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
अनिता डोंगरा यांची यशोगाथा
अडचणींवर मात करत पराभव न स्वीकारता कायमच यशाच्या दिशेने वाटचाल करत राहणाऱ्यांपैकी अनिता डोंगरा या एक आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत डिजाइनर मध्ये त्यांची गणना केली जाते. एकेकाळी दोन शिलाई मशीन पासून सुरुवात करणाऱ्या अनिता डोंगरा यांनी आज 1400 कोटी रुपयांचा फॅशन ब्रँड तयार केला आहे. त्यांचा कपड्यांचा स्वतःचा ब्रँड असून त्यांच्या ब्रँड अँबेसेडर मध्ये प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ ते हॉलीवुड स्टार बेऑन्से यासारखे प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
हाऊस ऑफ अनिता डोंगरा या नावाने त्यांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स आहेत. जर आपण त्यांच्या या फॅशन ब्रँडचे व्हॅल्युएशन पाहिले तर ते 1400 कोटी रुपयांच्या वर गेलेले आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये एक काळ असा होता की बऱ्याचदा त्यांनी डिझाईन केलेले कपडे रिजेक्ट करण्यात आले तसेच कोणताही दुकानदार त्यांनी डिझाईन केलेले कपडे दुकानात स्टॉक करायला तयार नव्हता. परंतु हार न मानता अखंड प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांनी आज देशातील टॉप डिझायनर्स मध्ये जागा मिळवली आहे.
कशी झाली या व्यवसायाची सुरुवात?
अनिता डोंगरा यांच्या या फॅशन डिझाईन व्यवसायाचा विचार केला तर त्यांना फॅशनची आवड प्रामुख्याने त्यांच्या आईकडून मिळाली होती. त्यांच्या आई या एका कपड्याच्या दुकानांमध्ये कपडे शिवायचे काम करायचे व या मधूनच अनिता यांना देखील फॅशनचे प्रेरणा मिळाली. जेव्हा त्या एकोणवीस वर्षाच्या होत्या व तेव्हाच त्यांनी ठरवले होते की आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचे आहे व फॅशन डिझायनर व्हायचे आहे.
परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाकडून खूप टोकाचा विरोध झाला. कारण फॅशन इंडस्ट्री च्या बाबतीत त्यांचे कुटुंब खूप अस्वस्थ होते आणि नकारात्मक होते व त्याच क्षेत्रामध्ये मुलीने जावे हे त्यांना अजिबात रुचणारी बाब नव्हती. घरच्यांचा विरोध असताना देखील त्यांनी हे पाऊल उचलले व यामध्ये त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे याबाबतीत त्यांना त्यांच्या आईचा खूप मोठा सपोर्ट होता.
या व्यवसायामध्ये अडचणी आणि आव्हानांचा सामना करत तसेच मित्र-मैत्रिणींकडून देखील अनेक टोमणे ऐकत त्यांनी संघर्ष सुरू केला. अनिता या वयाच्या विसाव्या वर्षात असताना त्यांनी कमवायला सुरुवात केली व आर्थिक दृष्ट्या त्या सक्षम होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. जर आपण फॅशन आणि कपड्यांच्या ब्रँडमध्ये महिलांचा विचार केला तर ही संख्या खूपच कमी आहे हे त्यांच्या लक्षात आले व हीच बाब डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी 300 चौरस फूट जागेतून आपला ब्रँड सुरू केला. त्यामध्ये त्यांनी भारतीय परंपरेशी पाश्चात्य फॅशनची व्यवस्थित सांगड घातली व कपडे तयार करायला सुरुवात केली. कपडे तर तयार होत होते परंतु ते विकायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता. परंतु त्यांचे कपड्यांची डिझाईन व फॅशन आधुनिक असल्यामुळे अनेक शॉपिंग मॉल पासून ते फॅशन शॉपपर्यंत त्यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचा स्वीकार केला गेला.
त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला व 1995 मध्ये त्यांनी पहिला ब्रँड उघडला. यावेळी त्यांनी एका स्टोअरने सुरुवात केली आणि आज त्यांची संपूर्ण भारतामध्ये 270 पेक्षा जास्त फॅशन स्टोअर्स आहेत. अनिता डोंगरा यांच्या ब्रँडची ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्लॅटफॉर्मवर खूप मोठी क्रेझ असून लोक त्यांच्या डिझाईन केलेल्या कपड्यांचे खूप मोठे ग्राहक आहेत. अनिता डोंगरा यांची आज एकूण संपत्ती पाहिली तर ती 1400 कोटींच्या पुढे गेली आहे.